Search This Blog

Friday, 29 November 2013

Birthday wishes and me

आज वाढदिवसाच्या शुभेछा प्रिय जणांकडून आल्या तशाच वरकरणी शुभेचू पण मागून सतत द्वेष करणाऱ्या सहकारी किवा नातेवाईकांकडून सुद्धा आल्या .

  खरेतर वाढदिवस साजरा करणे वगैरे काही आपली संकल्पना नाहीच . पूर्वीच्या काळी घरात एवढी मुले असायची कि घराच्या बाईला  मुलांचे जन्म दिवस लक्षात ठेवून साजरे करणे जमत नसावेच . शिवाय एकत्र कुटुंबात सर्वांचे वाढदिवस शक्यच नसे . पण हळू हळू कुटुंबे छोटी झाली आणि बायका सुद्धा मिळवू लागल्याने पैसे येऊ लागले आणि मग वाढदिवस साजरे होऊ लागले . मग मित्रांना आणि मैत्रीणीना बोलवून समारंभ चालू झाले .   काही जण  भेटी द्याव्या लागतात म्हणून टाळण्याची करणे शोधू लागली !

तर  आज मला  जेव्हा शुभेच्या येऊ लागल्या तेव्हा विचार करू लागलो वाढदिवसाचे आपले कर्तुत्व काय ? वयाची एवढी वर्षे येण्या साठी आपण काय केले ? आई वडिलांनी जन्म दिला आणि निसर्ग धर्माच्या  नियामापणे वाढत गेलो ……मग सर्व  जण नियमाने अभिनंदन का करतात?  नेते मंडळी लहान थोर आपले
कागदी होर्डींग्स  लाऊन मोकळे होतात  . काय त्यांचे कर्तुत्व ? माझ्या पुरते बोलायचे तर सतत ध्येय , अर्थात , स्वताच्या समृद्धी साठी धावत राहिलो . प्रथम अभ्यास , नंतर करियर …हे करताना कित्येकांना कर्तव्यासाठी दुखावले , जे माझ्या बरोबरच्या स्पर्धेत हरले अर्थात ते तर अतिशय जास्ती दुखावले .

पण याच आयुषाने खूप चांगले संस्कार देणारे आई आणि वडील दिले ,खूप प्रेम करणारे घर दिले , अत्यंत जिव्हाळा देणारे मित्र मैत्रिणी दिल्या , मला घडवणारे गुरु दिले तर कर्तव्य आणि काम याला देव  म्हणायला शिकवणारे  बॉसेस  दिले !   संकटात किवा सुखात अलिप्तपणे   साथ देणारी पत्नी मिळाली आणि जीवनात रंग भरणारी गोड  नातवंडे मिळाली !  आयुष्यात या पेक्षा काय हवे असते !

जेव्हा बाबा आमटे सारखी माणसे पाहतो तेव्हा जाणीव होते कि आपण आयुष्यात असे का केले नाही  ज्यामुळे हजारो लाखो लोकांना जगण्यासाठी मदत केली ? जंगलात जाऊन आनंदवन तयार केले , किती लोंकाची सेवा केली आणि महारोग्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला .  ह्या कामासमोर माझे काम ते काय ?

स्वतः पुरते जगण्यात काय कर्तुत्व आहे ? असा विचार सतत घोळत असला तरी काहीच केले नाही , ही खंत वाटतेच

उरले आयुष लहान मुलांना ज्यांना बालपणाच्या आनंदा  पासून वंचित राहावे लागते त्यासाठी माझ्या परीनी जे करता येईल ते करेन …. आज निदान संकल्प सोडत आहे . पुढल्या वर्षापर्यंत  काही तरी काम करीनच .






Sunday, 27 October 2013

काल  दिवसभर टेलीविजन वर एका बातमीने दिवस भर जगासमोर आपल्या मूर्खपणाची साक्ष जगाला देत होतो. प्रसार माध्यमे सुद्धा त्यांच्या ओबी व्यान्स दिवसभर ठेऊन भर पाडीत होत्या . उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यात एका साधूला म्हणे दृष्टांत झाला कि एका जुन्या किल्ल्यात १००० टन सोने  पूर्वजांनी पुरून ठेवले  आहे  .  ह्या बातमीने सरकारचे पुरातत्व खाते त्यांच्या सर्व साधनानिशी धावत गेले , मग खुपसे सरकारी अधिकारी , पोलिस  आणि प्रचंड जत्राच भरली . जत्राच ती , मग उघड्यावर जिलब्या , आणि इतर खाद्य यांचा धंदा चालू झाला ……।  इकडे नरेंद्र दाभोलकर असल्या अंध श्रद्धा विरुद्ध झगडून आयुष्याची आहुती देऊन गेले ,

किती अंध श्रद्धा आपल्या समाजात बोकाळल्या आहेत ,

एकीकडे मंगळावर यान पाठ्वयाची शेखी मारायची आणि दुसरीकडे मंगळ पत्रिकेत आहे म्हणून लग्न मोडायचे !  गुप्त धनासाठी बालकाचे बळी  , मुलगी होणारं म्हणून तिचा जन्माआधीच गळा दाबायचा . खूप चीड येणाऱ्या गोष्टी आपल्या कडे घडताहेत . यात सुक्षिक्षित मंडळी काही मागे नाहींत . कुलदीपक हवा म्हणून ही मंडळी काही करण्यास तयार असतात .  माझ्या आईला आम्ही पाच मुलेच . त्यामुळे कित्येक नातेवाईक आणि ओळखीची मंडळी माझ्या आईकडे पाळणा मागून घेऊन जायचे .  अंधश्रद्धा अशी कि त्या पाळण्यात फक्त मुलगा जन्माला येतो . मी तर म्हणायचो कि आपण त्यावर रोयाल्टी लावावी . तर सांगायचे म्हणजे  हि मुलासाठी असलेली ओढ   कित्येक मुलींचा बळी घेत आहेत . कालच्या वर्तमान पत्रात अशीच एक धक्कादायक बातमी होती . मुलगी झाली म्हणून छोट्या बाळाला तिच्या पित्याने आपटून मारून टाकले ……… 

एक  कविता ऐकली होती . ती साधारण अशी होती . एक छोटी स्वर्गातून आपल्या आईला उद्देशून म्हणते, जिला जन्म होण्या आधीच मारले होते … गर्भलिंग तपासणी नंतर ……क्रुर पणे  

आई तुझी इथे खूप आठवण येते 
इथं सर्व काही छान आणि सुंदर आहे 
इथे दुधाच्या नदया वाहतात 
इथे चॉकलेट ची घरं आहेत 
इथे कुणी मला मुलगी म्हणून मारत नाहीत 
तरी पण आई तुझी खूपच आठवण येते 
का ग आई मला इथे पाठवून दिलेस 
खूप गर्दी झाली आहे का पृथीवर 
इथून तर पुर्थ्वी खूपच छान छान दिसते 
कसे आहेत बाबा , मला त्यांच्या कुशीत झोपायचे होते 
पण का तुम्ही मला दूर केलेस 
आई तुला तुझ्या आईने असच इथे पाठवले असते तर 

पण तुझी खूपच आठवण येते ....असा काही आशय होता , पण खूपच हृदयस्पर्शी !
हा प्रश्न सर्व बायकांनी सक्षम होऊन सोडवला पाहिजे . आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत  . आपल्या करिअर वर किवा आपल्या गुणावर पाणी सोडू नये 
.
नवरा आणि बायको समान हक्काने जगलेच पाहिजेत . असे मला नेहमी वाटते…
आपण सर्वांनी आपल्या पुरते बदलले तरी खूप होणार आहे , घरातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या स्त्रीला मान आणी योग्य कौतुक ठेवावा .  माझी  चिमुरडी नात हि जगातील सर्वात गुणी आणि सुंदर मुलगी वाटते ती  ह्य्साठीच .
  




Tuesday, 15 October 2013

नुकतच  फायलीन नावाचे वादळ थयथयाट  करून गेले . या सर्वं  वादळांची  नावं  स्त्री लिंगी का ठेवतात  हा प्रश्न
मनात येतोच . दोन  वर्षा पूर्वी अमेरिकेत कतरिना वादळाने धुमाकूळ उडवला . विज्ञान आपले काम करीत असते .विज्ञान अगदी वादळाच्या जन्माच्या हालचाली  सुरु झाल्या कि आपले  वैज्ञानिक नजर ठेऊन असतात .
निसर्ग  सुद्धा अतिशय शिस्तीचा असतो . वादळ होण्याच्या आधी समुद्र  एका ठराविक  खोली पर्यंत एका ठराविक तापमान गाठ्ते . आणि मग समुद्राचे पाणी बश्पिभावानामुळे हाहा हलके होऊन वर जाऊ लागते आणि त्याची जागा हवा
खेचून भरली  जाते असे काही तरी होते …. आणि मग ते पूर्वेकडून पश्चिमे कडे वाहू लागतात . त्याशिवाय पृथ्वी हालचाली वर अबलंबून बर्याच घडामोडी होत असतात … पण निसर्ग आपलं  चक्र चालू ठेवते .  २२० किलोमीटर वेगानी  वादळ वाट आक्रमत असते . मग वाटेत जे येईल त्याचा विध्वस करत जाते .
ह्या वेळेला एक गोष्ट अगदी भारतीयांना अभिमान वाटण्यासारखी होती . ती म्हणजे आपल्या हवामान खात्याची कर्यक्षमता …। त्यांनी अगदी अचूक वेळ एका आठवडा आधी पासून वर्तवित होते . अमेरिकन आणि इतर देशांनी  आपले हवामान खाते चुकतंय असे सतत सांगितले . पण डॉ  राठोड आणि सहकारी आपल्या मतावर ठाम  होते . त्यांनी वेग , कुठे जमिनीवर उतरणार , पुढे किती तास थैमान घालेल  वगैरे सांगत होते . ह्या पूर्व  सूचनांचे योग्य वापर करून ९ लाख लोकांना  सुरक्षित  जागी हलवून जीवीत हानी  फक्त २२ वर आणली ……… प्रथमच भारतीय अस्ल्याचा सार्थ अभिमान  
वाटला .  आपल्या सर्व  यंत्रणा खुप  छान  काम करून लोकांचे हाल कमी केले . नेहमी प्रमाने आपल्या जवानांनी शर्थ  केली …….    


मुख्य म्हणजे कोणी पुढारी हवाई पाहणी करायला आले नाही  अर्थात हिम्मत असणारच नाही .

संकटात कसे सर्व वैर विसरून देवाची प्रार्थना करतात याचे दुसरे दिवशी प्रत्यायास आले . एका तुरंगाची २० मीटर भिंत
जोरदार वार्याच्या दणक्यात रात्री पडली . अधिकारी वर्ग चिंतेत होते कि सर्व कैदी पळून जातील . पण वेगळच घडले सर्वकैदी आणि शिपाई एकत्र प्रार्थना करीत होते …।

निसर्गाचा आपण वेध घेऊ शकतो पण त्यावर तुमहाला मात  करता  येत नाही हेच खरे 



Thursday, 10 October 2013

Puneri Chini Bhai Bhai

आज पर्यन्त आपण पुणेरी पाट्या ऐकून पुनेकरांची खुप थट्टा केली अणि नेहमीच तिरकस पाहत होतो। पण आता त्यांना एक स्पर्धक तयांर झाला आहे , असच म्हणावे लागेल  तो ही आंतर्राष्ट्रीय।   नुकतेच चीन मधे परदेशी प्रवास जाणारे नागरिक एका मजेदारिक सुचनाना सामोरे गेले।त्याअधि काही आपल्या पाट्या पाहू


आता चीनी सूचना पाहुया  खरे तऱ  ह्या सुचना भाऱतिय़ा ना  खुप लागु आहेत   

1] Stop picking your teeth with nails . [ Ask for a tooth pick .If not available ,go to wash room and gargle ,And yes use your nails if you want to take out irascible food particles.Just don't do it front of all diners in the restaurant.No  it  doesn't make you popular ]
2] Do not  pick your nose in public
3]Do not  leave your footprints on seats of public toilets
4]avoid defacing monuments
5]Do not make loud slurping noise eating
6]Do not  pee in the swimming pool nor in public places ,in full view of others
7] Trim your nose hairs and hairs on ears
8]Do not steal life jackets from planes
9]Do not scratch your bits and pieces in Public
10] Do not occupy public toilets for ever

एक़  नक्की   देश कितीही प्रगत होवो सूचना लागतातच

दसराच्या शुभेचा 


















Sunday, 22 September 2013

Our life and Technology

तंत्रज्ञान आणि आपण 

हल्ली आपण अगदी सहजपणे  कुणा लाही सांगतो …TEXT  कर किवा व्हात्सप कर .  मग त्यावर  फोटो , कॉपी  एका सेकंदात जगाच्या टोकावर कुठेही पाठवतो . अगदी तीन चार वर्षाची माझी नातवंडे सुधा सहज पणे त्याचा वापर करतात 


. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात खूप ताणताणाव निर्माण केले आहेत हे खरे ।  एख्द्याने जर whatsap  केले असेल आणि त्याला तुम्ही जर का  उत्तर दिले नाहीत तर खैर नाही . जर तुमच्या बॉस ने पाठवले असेल आणि तुम्ही उत्तर दिले नसेल तर तुम्ही  नॉन रीस्पोन्सीव सहकारी  ठरता . … मग  बरीच  वर्ष मागे  गेले  की  जाणवते  आयुष्य खूप शान्त आणि सुखाचे होते . मी  जेव्हा नौकरी सुरू केली  तेव्हा संगणक सुरु  झाले होते .  मेमो  सेक्रेटरी  तयार करून  त्यावर  सही केल्यावर  पाठवले  जायचे . दोन दिवसांनी  त्याला  उत्तर  यायचे .  एकूणच  सर्व  काही  शांतपणे चालायचे .

तीच गत  फोन च्या  बाबतीत . आठवा तो  काळ जेव्हा फोन नोंदणी करताना टेलिफोन वाले ग्राहकांना रडकुंडीला आणायचे . ज्यांच्याकडे घरी फोन असायचे  त्यांना खास  status  असायचे .

पण  सॅम पित्रोदा या विलक्षण  माणसाने  सर्व चित्र  बदलूनच टाकलं . नन्तर बाहेर गावी किवा परदेशी  बोलणे फारच सोपे   झाल.
नंतर  अर्थात  मोबाईल फोन ने  उल्थापालथ  केली . अगदी भाजीवाल्यापासून  मोलकरणी  पर्यन्त सर्वच फोन कानाशी लाऊन  बोलताना  दिसले . त्या बरोबर सर्व  माणसे जोडली  गेली . मग ती पत्रे , तारा  सर्व  काही गायब झाली . पण
त्याच  बरोबर  प्रेमाची , वाट पाहायला  लावणारे  सुंदर  क्षण हि हळू  हळू  लुप्त  झाले . पत्रांची  वाट पाहणे  संपले . वाढदिवसाला  किवा सणांना  भेटून सदिच्छा  काळाआड  गेल्या आणि  कोरडे  SMS  फिरू  लागले ।
मग  वाटते  तंत्रज्ञान  आणि आपण याचा योग्य  balance व्हायला  हवं




Wednesday, 18 September 2013


आज गणपती बाप्पाला सर्वांनी निरोप दिला . गेले दहा बारा दिवसात सर्व लोकांचे कान किटून गेले असतील.कित्येक आजारी किवा लहान मुलांच्या झोपा कर्कश आवाजाने उडाल्या असतील पण त्याचे कुणालाच देणे घेणे नाही . सण किवा एखादा धार्मिक क्षण साजरा करताना ध्वनी प्रदूषण का करतात आणि कुठल्या शास्त्रात लिहून ठेवले आहे हे त्यांनाच माहित . खरे तर साक्षात गणपती सुद्धा आवाजाला किटला असेल. तो देवच का हे बंद करीत नाही हे माहित नाही बिचारे लोकमान्य टिळक ! त्यांना खरे आपण हे सर्व का सुरु केले असेच वाटत असेल. जन जागृती साठी सुंदर प्रसन्न प्रयोग सुरु केले त्याचे इतके बाजारीकरण होईल असे वाटले नसेल त्यांना. sorry आदरणीय लोकमान्य टिळक . आम्ही तुमचे कार्य कुठल्याच क्षेत्रात तडीस नेहेले नाही. देशभक्ती फक्त सिनेमा गृहात राष्ट्र गीत चालू होते तेव्हा उठून उभे राहण्यापुर्ते मर्यादित ठेवले आहे . पुढील वर्षी देव आम्हाला सद्बुद्धी देओ .

Tuesday, 17 September 2013


माझ्या लहानपणापासून शिपिंग व्यवसायाचे एक प्रचंड आकर्षण होते . माझ्या शाळेत एकदा एका शिपिंग कंपनीचे काही अधिकारी आले होते आणि माझ्या एका मित्राच्या भावाला खलाशी म्हणून नेमणूक करून घेऊन गेले. सबंध गावामध्ये चर्चा आणि चुरस कथा येऊ लागल्या . त्या काळी इम्पोर्टेड वस्तूंचे आकर्षण त्यांनी सुट्टीत आणलेल्या आम्हा सर्वाना होताच . नंतर माझा मोठा भाऊ अधिकारी झाला . त्याच्या बोटीवर फाइव स्टार हॉटेल प्रमाणे वातावरण पाहून आम्ही सर्व खुश होत असू . पण हल्ली जागतिक मंदी मध्ये हा पूर्ण व्यवसाय भरडला गेला आहे . त्यातून सागरी चाचे अधून मधून जीवघेणा त्रास देतात . आपल सरकार फार काही करू शकत नाही . आज बातमी वाचली ......कित्येक बोटी बंदरात अडकून आहेत . इंधन नाही , काम नाही म्हणून बोटीवरील लोकांना पगार नाही सुविधा नाहीत ......न्यालायानी बोटी विकून पगार द्या म्हणून आदेश दिलेत ....पण इलाज नाहीत.... अचानक आलेली स्थिती पाहून वाईट वाटले . एक चकचकीत असा मार्ग असुरक्षित झाला खरे तर देशाची अर्थ व्यवस्था पूर्ण अवलंबून असते . कधी बाहेर पडेल या वाईट अवस्थेतून ?

Sunday, 8 September 2013


मंगलमूर्ती गजाननाचे आगमन उद्या सर्वत्र होईल . गणपती दैवत हे माणसावरील संकटे दूर करते अशीच श्रद्धा आहे . गणपतीच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण होते . पण आज ह्या गोष्टीवरून विश्वास उडू लागला असे वाटते . कारण आज सर्वाचे बाजारीकरण झाले आहे . छोटे मोठे राजकारणी आणि गुंड प्रवृत्तीचे गल्लीतले नेते यांनी बळजबरीने हे सार्वजनिक गणपती मंडळे हाती घेतले आहेत . आणि तिथूनच चांगली माणसे मागे पडली .पूर्वी हि सर्व मंडळे समाजातील विचारवान्ताना बोलवीत असत , उत्तम कलावंताना आदराने कला सादर करण्याची संधी दिली जात असे. वातावरण एका पवित्र भावनेने भरलेले असायचे . आज सगळीकडे खर्चिक रोषणाई ज्या लोकांवर लादलेल्या वर्गणीतून केल्या जातात . लोकाच्या भावनांचा बाजार करून गर्दी करण्यासाठी वापरायचा हे सरास चालू आहे. अर्थात काही मंडळे अपवाद आहेत. आताशी हे सण आले कि अंगावर काटा येतो . जोरजोरात कर्कश आवाजात ढोल बडवतात त्यात बॅंजो नावाचे विचित्र वाद्य कान किटून टाकतात . त्यांना कसा त्रास होत नाही हे मोठे कोडे असतं. त्यांची काय मानसिकता असते हे त्यांनाच माहित . तीच गोष्ट गोविंदाची . मुले पडतात आयुष्यात उठून जातात. का आपला समाज राजकार्ण्याचा पाठ पुरावा करतात . ? का पर्यावरणाचा नाश करताहेत ? गल्ली बोलत गणपती बसवण्या ऐवजी एका ठिकाणी बसवून खर्च कमी करत नाहीत? मी कधीच गर्दीत घुसून दर्शन घेत नाही किवा पैसे देऊन , कोणाची तरी ओळख काढून घुसायचा प्रयत्न करीत नाही माझ्या कडून मी प्रामाणिक पणे सर्व बाजारीकरणा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो किवा पळवत शोधतो म्हणायचे . कधी तरी धैर्य येउन मी मी वाईट प्रवूर्तींचा मुकाबला करेन !!