आपली राष्ट्रीय स्मारके
शेक्सपिअरचा ४५०वा वाढदिवस २३ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जाईलच, पण त्याचा सोहळा प्रत्यक्ष पाहायचा असेल तर तो लंडनमध्येच पाहायला हवा. हा वाढदिवस २३ ते २६ एप्रिलदरम्यान पुढील सहा पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
१) १५६४ मध्ये शेक्सपिअरचा जन्म स्ट्रॅटफर्ड अॅव्हान येथील घरी झाला. त्या घराला भेट देऊन त्या घराचा संपूर्ण इतिहास तुम्हाला गाईडकडून जाणून घेता येईल.
२) या जन्मठिकाणी गेस्टबुकमध्ये स्वाक्षरी करता येईल, जे वर्षांतून केवळ एकदाच उघडले जाते. या पुस्तकाचे वैशिष्टय़ असे की, १८४७मध्ये त्यात प्रसिद्ध लेखक थॉमस हार्डी आणि चार्ल्स डिकन्स यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात तुमचाही समावेश करता येईल.
३) जन्मठिकाणाहून निघाल्यावर तुम्हाला शेक्सपिअर सर्वाधिक काळ ज्या ठिकाणी राहिला, जिथे बसून त्याने लेखन केलं त्या पूर्व लंडनची सैर करता येईल. २२ आणि २३ एप्रिलला सकाळी अकरा वाजता ही शेक्सपिअर वॉकिंग टूर सुरू होईल.
४) त्यानंतरचे ठिकाण असेल ग्लोब थिएटर दर्शन. १५९९ साली बांधलेल्या आणि शेक्सपिअरच्या अनेक नाटकांचे प्रयोग झालेल्या या थिएटरला भेट देणं हा संस्मरणीय अनुभव असेल. तिथे तुम्हाला हॅम्लेट हे नाटक नव्या प्रयोगात पाहता येईल.
५) ग्लोब थिएटरमध्ये असतानाच १५८७मध्ये बांधले गेलेले आणि लंडनमधील सर्वासाठी खुले असलेले हे एकमेव एलिझाबेथन प्लेहाऊस आहे. या प्लेहाऊसच्या इतिहासाचा १५ मिनिटांचा व्हिडीओही पाहण्याची सोय आहे.
६) शेक्सपिअर ज्या ‘गॅरिक इन’ नावाच्या पबमध्ये बसून मद्यपानाची आस्वादयात्रा करत असे, त्या पबमध्ये बसून तुम्हालाही एक पेग मारता येईल.
हे सर्व परवा मराठी दैनिक लोकसत्ता मध्ये वाचले आणि कौतुक वाटले आणि खेद झाला . खेद ते साजरा करतात म्हणून नाही तर आपल्या कडे अश्या आपल्या अलौकिक लोकांची स्मारके ज्या स्थितीत आहेत ती ऐकून किवा पाहून होते . माझा एक मित्र झाशी च्या राणी जन्म गावी ती महान स्त्री जन्मली तो किल्ला पाहण्यास गेला आणि त्याला
रडूच आले . त्या किल्ल्याच्या भिंतीला लागून म्हणे गलिच्छ वस्ती आणि सार्वजनिक शौचालय बांधली आहेत . किल्ला
पडत आला आहे , त्यात रानटी झाडे उगवली आहेत
मध्ये एका मराठी वाहिनीने शिवाजी महाराज आग्र्याहून कसे मोगलांना चकवून निघाले आणि त्या आधी कुठल्या वाड्यावर राहिले हे दाखवले …. त्या वाड्याची अवस्था आणि आजूबाजूची वस्ती पाहून खूप वाईट वाटले …. अश्या पराक्रमी वीराने , आपल्याला क्रूर मोगलापासून सतत वाचवले , ज्याच्या नावावर आजचे राजकारणी सत्ता भोगतात त्यांना असे का वाटले नाही कि महाराज जिथे जिथे राहिले त्याच्या आजूबाजूची जागा विकत घेऊन स्मारक म्हणून
जपून ठेवावेत ? हजार पंधराशे कोटी खर्च करून समुद्रात भर टाकून पुतळे उभे करण्याऐ वजी असे काही का करीत नाहीत ? वर सांगितलेले शेक्स्पिअर ची सुंदर जत्रा हे गोरे लोक भरवतात आणि जगातल्या असंख्य लोकांना भेट देण्यास प्रोत्साहित करतात . त्यात पर्यटन वाढवीत आहेत
असे का आपण करीत नाही ?
अगदी अलीकडे आपण विक्रांत युधनौकेची ची करुण कहाणी वाचली . शोकांतिका आहे कि या शूर वीर बोटीला भंगार म्हणून विकायला निघालो आहोत …… आपल्याला शरम सुद्धा वाटत नाही याचा खेद वाटतो आणि आपण काही करू शकत नाही याचे शल्य वाटत राहते