Search This Blog

Sunday, 24 April 2016

Photos of amazing nature

(Photographs  published with Permission of Dr Vijay Tuljapurkar )

निसर्गा मध्ये कित्येक खुबी अशा आहेत कि आपल्याला थक्क करून सोडतात . ओकी दिसणारी झाडे कधी बहरून जातात याचा आपल्याला अंदाज येउच शकत नाही , काल संध्याकाळी झाडावर एक पान पण नाही आणि अगदी ओकं बोकं पण सकाळी पाहतो तर छान रंगीबेरंगी पानांनी बहरून आलेले …। कसे होते हे ?

माझा मित्र  विजय तुळजापूरकर  पेश्याने कॅन्सर डॉक्टर . अमेरिकेत शिकून , राहून परत मिरजेला अनेक वर्ष स्थायिक पण निसर्ग आणि फोटोग्राफी मध्ये प्रचंड आवड . त्यांनी घेतलेले काही फोटो परवानगीने टाकत आहे
त्यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्तात देत आहे

" Kate savar is also know as Silk cotton, Semul in Hindi and Bombax ceiba in Botany .This tall ad majestic tree is deciduous meaning it sheds leaves in winter ,As Vasant ritu approaches and soon hundreds small buds appear on leafless branches and soon hundreds of red colored blooms adorn the tree . The flowers are large in size ,pink to deep red in color and form a cup in which copious amount of nectar is secreted .Several birds visit these flowers to suck nectar . Birds that visit are mynahs ,golden orioles,parakeets , sun birds and drongos etc  This is a beautiful indigenous tree. Though there are several grand specimen in sahyadri range my favorite spot is Radhanagri where one can see thousands of flowers from late January to mid February . one visit to this site is enough to get you hooked to this grand floral display  . Four photos are from Panhala  and Amba













Thanks Vijay . I hope i will use my camera one day and catch up some beautiful moments with nature .


24 th April 2016

शेक्सपीअर ४०० वर्षे , अजूनही कालातीत अजब वल्ली

 शेक्सपीअर आजच्याच दिवशी , २३ एप्रिल १६१६ , म्हणजे बरोबर ४०० वर्षापूर्वी मरण पावला . आजही जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही जिथे त्याच्या साहित्याचा प्रभाव पडला नाही  .  आज गुगल ने त्याचे चित्र dudal  लाऊन सर्व जगाला त्याची आठवण करून देऊन त्याच्या कामाची  आठवण जागवली आहे .  तो अस्सल किमयागार होता हे खरे . तो फक्त ५२ वर्षे जगाला पण किती प्रचंड काम केले .
किमयागार 

तसे तर युगपुरुष नेहमीच छोट्या आयुष्यात खूप अलौकिक कामं  करून आपला ठसा कालातीत ठेवतात . द्यानेश्वर माउली , शिवाजी महाराज  किती कमी आयुष जगले पण त्यांनी केलेली कामं सामान्य माणसाला   दहा आयुष्यात जमली नसती .

त्याच्या हयातीत इंग्रजांनी खूप ,मान  आणि पैसा दिला . आणि त्याच्या मृत्यू  नंतर ४०० वर्षे त्याचे घर , तो जिथे राहायचा ती वास्तू  अजूनही प्राणापलीकडे जपून ठेवली आहे . गेल्या चार शतकात जगातील सर्व देशात त्याची नाटके , कविता , सुनीते (Sonnet) ह्या बऱ्याच  आधुनिक भाषात झाली आहेत . असे म्हणतात त्याची सुनीते एका स्त्री ला उद्देशून आहेत . मेरि  फिटन या  कृष्णवर्णीय स्त्रीला उद्देशून होती, ती म्हणे इतर इंग्रजा पेक्षा कमी गौर वर्णीय होती . ती खूप धनिक होती आणि त्याच्या प्रेमात होती असेहि  म्हणतात . 

तसे तर तो नट होण्यासाठी लंडन मधील ग्लोब थिएटर मध्ये आला पण नंतर नाट्य लेखनात गुंतला ।  ती नाटके इतकी गाजली की  मानवी मन  आणि नातेसंबध ह्याचे अतिसुंदर कालातीत भाष्य होऊन राहिली आहेत गेली चार दशके .  आपल्या कडेही हिंदी ,मराठी  नाट्य  व सिनेमा मध्ये खूप प्रभाव करून गेला आहे .  ज्यांनी शेक्सपीअर वाचला सुद्धा नाही त्यांना सुद्धा ह्या मराठी हिंदी कलाकृतींनी  प्रभावित केले . ह्यावरून  शेक्सपीअरनी  लिहलेल्या कलाकृती किती समृद्ध होत्या ह्याची कल्पना येते.   आपल्याकडे कुसुमाग्रजांनी नटसम्राट  अजरामर  केलं .  विशाल भारद्वाज ने  मकबूल (म्याक्बेथ ) , अंगूर (कॉमेडी ऑफ एरर्स ) , ओंकारा , हैदर (hamlet ) सारखे आधारित अप्रतिम सिनेमा बनवले .  इतकी वर्ष होऊन मानवी  स्वभाव बदलला नाही हे खरच म्हणायचे 

आमच्या शाळेत देशपांडे सर होते ते लिअर ची कथा मन लाऊन सांगत ……. ते सांगताना ते अभिनय करत असत .  तेव्हा पासून वाटायचं कि आपण कधीतरी आयुष्यात शेक्सपीअर वाचायचा . 

त्याशेक्सपीअरची  वाक्ये आपण अगदी सहजपणे  वापरतो …… to be or not be , Brutus you too , That omay smile and smile and be a villain "  हे Hamlet  मधले प्रसिद्ध वाक्य , जे आपण रोजच्या आयुष्यात दुट्टपी वागणाऱ्या मित्राचा बुरखा फाडणारा आहे   

ज्या काळात शेक्सपीअर लिहित होता त्याचकाळात आपल्याकडे संत एकनाथ द्यानेश्वरीची  ची प्रत शुद्ध करण्यात गुंतले होते असे म्हणतात . शेक्सपीअर काळाच्या पुढे असणे दिसून येते . आजहि  जगातील भाषा शास्त्रज्ञ  , मानसशास्त्रज्ञ त्याच्या समस्त लिखाणाचा अभ्यास करीत आहेत 

इंग्रजी साहेबाचा कौतुक असे कि आज आजही stanford  ह्या त्याच्या जन्म गावी त्याचा जन्मदिन सण  साजरा केल्याप्रमाणे  त्याला अभिवादन करतात 

गोविंद तळवलकर म्हणतात "शेक्सपीअरच्या नाटकांना देशकालाच्या मर्यादा नव्हत्या . त्यामुळे असे म्हणायचा  प्रघात पडला की  सर्व जग हि रंगभूमी होती आणि रंगभूमी ही त्याचे जग होते "

नेल्सन मंडेला त्यांच्या २७ वर्षाच्या कारावासात शेक्सपीअरचे  सर्व साहित्य खंड ठेऊन असायचे . ज्या रॉबिन बेटावर ते होते त्याला तेथील बायबल असे म्हणायचे . साथीदारांना नाटकातील उतारे वाचून दाखवायचे 


कधीतरी शेक्सपीअर वाचायची इच्छा  आहे  किवा त्यासाठी माझ्या इंग्रजी जाणणाऱ्या  मित्राला  गाठणार आहे





23 rd April 2016

Saturday, 16 April 2016

BAD TOLERANCE AND GOOD INTOLERANCE

 नुकतच  आमिरखान आणि इतर मंडळीनी आपल्या देशातील Intolerance वर भाष्य  केल्यावर  प्रचंड गदारोळ उठला . काही अतिउत्साही लोकांनी त्याला भारत देश सोडून जाण्याचा फुकट सल्ला दिला ज़णू विचार स्वातंत्र्य फक्त त्यांनाच होते आणि आमिरखानला  नाही  . पण पाहूया  " Tolerance " किती वाईट असू शकतो  आणि "Intolerance" किती चांगला असू शकतो  .  मला हे लिहताना इंग्रजीचा आधार घ्यावा लागतोय . 

BAD TOLERANCE 

  • Jump the signal even if you are driving a BMW and we tolerate 
               
Jump the traffic signals 
  • So called "rich" persons donot  repay bank's loans and still enjoy at cost of tax payers money saved in private and public banks . We tolerate this 
  • Politicians and people in authority  misuse the funds meant for animal fodder amounting to crores but yet we tolerate such people and make them our  law makers 
                                  
Corruption at high places 
  • Influential people in the society defy all norms of honesty and default crores of rupees  loans taken from PSU banks , indulge in corrupt practices , evade tax and deposit  their wealth in tax heavens . Yet we tolerate such people and bear the burden of their acts .
  • We keep our homes and personal space clean but  litter public places , spit on roads , public places , walls of public offices  and we tolerate  these people in society .
                
Dirty the public space 
  • All people  who travel abroad praise and talk high about discipline  observed by citizen of those countries in maintaining cleanliness at public places but same folks as soon as arrive on Indian airports forget those good habits they praised and break ques , spit . and yet  we tolerate this change in behavior .
  • Maharashtra and particularly marathwada vidarbha regions are under severe drought conditions and human and animals are suffering due to acute water shortage . Bore wells do not   get water even below 1200 ft  There is no water for drinking , agriculture but lacks of liters of water are supplied  to wineries and beer plants . because  these factories have direct or indirect support of people in politics of all parties,  Public at large  suffer and TOLERATE   the injustice done to  common people and farmers of that region . 
                          
NO WATER WHERE TO GO ?
  • We the people from urban Maharashtra want  IPL and its display of wealth ?  when rest of Maharashtra is suffering from drought ,
                                                     
IPL TAMASHA 


NOW GOOD INTOLERANCE 
  • intolerance towards non transparent deals which hurts our country's economic progress 
  • Intolerance towards corrupt practices . Be bold to refuse to pay bribe 
  • Intolerance towards loss of productivity


15 April 2016
                       







  


Thursday, 7 April 2016

GREETINGS . HAPPY NEW YEAR GUDI PADVA 2016




 माझ्या  मित्र मैत्रीणीना आणि सर्व  हितचिंतकांना  गुडीच्या  पाडव्याच्या हार्दिक शुभेछा 



मला सतावणारे प्रश्न ??????



काही दिवसापूर्वी माझ्या बिल्डींग मध्ये राहणारे एक गृहस्त अचानक वारल्याचे समजले . आदल्यादिवशी लिफ्ट मध्ये भेटले होते तेव्हा नेहमीप्रमणे  हसले आणि बोलले . मग अचानक काय झाले ? ऐकून धक्का बसलाच पण विचारचक्र चालू झाले … असे झाले की  हे गृहस्त गुजराथी व्यापारी होते आणि नेहमी १० /११ वाजता घरी यायचे . नेहमी सकाळी देवळात , घरासमोर रस्ता ओलांडला कि असणारे , जायचे .  पण ज्या रात्री ते निवर्तले त्या रात्री ११ वाजता रिक्षेतुन देवळासमोर थांबले आणि देव दर्शन घेण्यासाठी उतरले तोच झाडाची फांदी अचानक तुटून त्यांच्या डोक्यावर पडली आणि तत्काळ मृत्युमुखी पडले . …… असे का होते कि लोक देवळात किवा देवळाला जाताना अपघाती मरतात ?  आपण नेहमी वाचतो एखादे कुटुंब शिर्डीला किवा तिरुपतीला किवा आणखी कुठ्लाश्या देवस्थानाला खास गाडी करून जात असते किवा दर्शन घेऊन येत असते आणि अखं  कुटुंब अपघातग्रस्त होते …असे का ?? देव असेल तर त्याला आपल्या भक्तांना का सवरक्षण देता  येत नाही .  दिंडीत असंख्य गरीब वारकरी श्रद्धेने देवाला जातात , बरचसे खेडूत  शेतकरी असतात मग बिचारे इतर वेळेला का गरिबीत आयुष काढतात . त्यांच्या अपेक्षा खूपच माफक असतात आणि देवावर अपार  श्रद्धा असते तरी त्यांना सावकार , राजकारणी , अधिकारी सर्व मिळून पिळून काढतात .  असे का ??
मोठ्या देवस्थानात  संचालक , पुजारी दागिने चोरतात , भ्रष्ठाचार करतात , गरीब भाविकांना लुटतात ते  सुटून जातात आणि सुखात राहतात असे का ???

कुणीतरी देवाची सोन्याची मूर्ती चोरून , वितळवून पैसे कमावतात  पण त्यांना का शिक्षा होत नाही ??

मध्ये कुठेतरी वाचले कि ते ऐकून धक्का बसला . भारतात मोठ्या देवास्थाना मध्ये प्रचंड संपती पडून आहे . दरवर्षी मिळणारे दान अंदाजे असे आहे
  1. तिरुपती बालाजी               १ हजार १३५ कोटी 
  2. वैष्णोदेवी                            ४०० कोटी 
  3. पुरी जगनाथ                       १६० कोटी 
  4. शिर्डी साईबाबा                    १०० कोटी 
  5. अयोध्या राममंदिर               १४० कोटी 
  6. कोलकत्ता कालीमाता           २५० कोटी 
  7. द्वारकाधीश                          ५० कोटी 
  8. मुंबई सिद्धीविनायक              २७ कोटी 
  9. त्रावणकोर                            ३५ कोटी 
  10. वैद्यनाथ धाम                         ४० कोटी 
देशातील सर्व धार्मिक स्थळाकडे  सुमारे८० लाख कोटी जमतात म्हणे ?  खरे किती आणि काल्पनिक किती हे मला माहित नाही .  देशाच्या आर्थिक बजेट पेक्षा जास्तच असावे .  हे सर्व  देवावर श्रद्धा असणाऱ्या  भाक्तानीच दिले आहेत . मग देशातील सर्व गरजू नागरिकांना मिळाले तर फार छान  होईल . हे जर मला वाटत असेल तर आम्ही निवडून दिलेल्या आमच्या सत्ताधीशांना का समजत नाही हा प्रश्न मला सतावतो आहे . खूपच भाबडा विचार वाटेल पण इलाज नाही .

आज  गुडी पाडवा .  देवाजवळ एकच  प्रार्थना .

तुझ्या गरीब आणि सामान्य जनतेला  अधाशी भ्रष्ट अधिकारी नेत्यापासून वाचव . नेत्यांना , पैशेवाल्या , वजनदार अश्या माणसाना वेगळे दर्शन देऊ नकोस .  एवढे केलस  तर मी मानेन