प्रिय अंबा ( आई )
आज तू कुठे आहेस माहीत नाही . पण तू गेल्यापासून एक हि दिवस असा गेला नाही कि तुझी आठवण येत नाही . तुझ्या नसण्याची जाणीव प्रत्येक क्षणी येते विशेषतः कठीण वेळात . वाटते तू असतीस तर ! माझा पुर्नजन्म संकल्पनेवर विश्वास नाही पण कधी तरी वाटते असेलच तू जिथे असशील तेथे असंच लोकांचा आनंद वाढवत असशील .
खूप कष्ट केलेस आम्हा सर्वासाठी . कर्तव्यापलीकडे खूप . माझ्या बद्दल तुझ्या मनात काळजी जरा जास्तच होती याची जाणीव मला आयुषात सतत होती म्हणून मी खूप झगडून यश मिळवण्याचा प्रयत्न केला . आजही तू घेतलेलं कष्ट , अगदी माझ्या लहानपणापासून जसे च्या तसे आठवतात . पण मी मात्र तुझ्या शेवटच्या दिवसात तुझी सेवा करू शकलो नाही याची खंत मनात सलते । येणारा माणूस जाणार हे नक्की असले तरी तू जाऊच नाहीस असे वाटायचे .
तुझा अजातशत्रू स्वभाव , सतत हसतमुख राहण्याचा चेहरा , प्रचंड आशावादी कलाकाराचा गुण मला अंगीकारता आला नाही कधीच .
आपली पुन्हा कधीच भेट होणार नाही पण तू मात्र मला नेहमी पदोपदी भेटत असतेस म्हणूनच मी मोठ्या आजारानंतर जगलो .इतकि वर्षे .
आज लौकिक जगात मी यशस्वी आहे . सर्व काही मिळाले . छान हसते प्रसन्न आनंदी घर आणि माझी जीव लावणारी माणसे . तरी पण माधव जुलियन यांची कविता काहीशी आठवते ती अशी
वाटे
इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे
