Search This Blog

Thursday, 24 July 2014

काल  संसदेतील काही नवीन खासदारांनी महाराष्ट्र सदनातील जेवण आणि सोयी योग्य नव्हत्या म्हणून तेथील कर्मचाऱ्याला अपनास्पद वागणूक दिलीच पण त्याला त्याच्या धर्मातील पाळत असलेल्या चालीरीती मोडण्यास भाग पाडले . हे वागणे नक्कीच अशोभनीय आहे. इथे ते सेवेचा ग्राहक होते आणि सेवा चांगली न मिळाल्याने चिडणे अगदी स्वाभाविक होते .  पण हेच सन्माननीय खासदार सामान्य ग्राहकाला मदत करण्यास पुढे येतात का ? आपण रोजच्या जीवनात किती सेवा पूर्णपणे अनभवू शकतो .? आणि आपण सर्व जण असा कायदा हातात घेऊन भांडू लागलो तर काय होईल?
दैनंदिन जीवनात लोड शेडींग किवा त्याशिवाय जितका वेळ वीज जातेय तेव्हा झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जाते का?  सरकारी किवा खासगी  टेलेफोन सेवा देणाऱ्या  कितीवेळा ग्राहकांना ठरल्या प्रमाणे सेवा देतात आणि तुम्ही दाद मागितली तर कशी उद्धट उत्तरे देतात ? रेल्वे , बस किवा विमाने त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे  न धावता प्रचंड मनस्ताप देतात तेव्हा ग्राहकांनी काय करावे ?

एकूणच सर्व जण आपल्या पुरता विचार करून आयुष जगतात .

ह्या उलट एक प्रत्य क्ष आलेला अनुभव सांगावाच लागेल . माझ्या एका मित्राने लंडन मधील एका दुकानात एक वस्तू २० टक्के सेल मध्ये घेतली आणि काही दिवसांनी ती वस्तू ठीक नव्हती म्हणून परत केली . दुकानातील त्या कर्मचारयांनी अधिक पैसे परत केले . माझा मित्र त्याला म्हणाला कि तुम्ही चुकून जास्ती पैसे देताय . त्यावर तो म्हणाला , सर आज त्या वस्तूची किंमत तेवढीच म्हणजे सेल पेक्षा जास्ती आहे .  मित्र थक्क झाला


Sunday, 20 April 2014

आपली राष्ट्रीय स्मारके


Sat, 19 Apr 2014 01:02 
आपली राष्ट्रीय स्मारके 
शेक्सपिअरचा ४५०वा वाढदिवस २३ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जाईलच, पण त्याचा सोहळा प्रत्यक्ष पाहायचा असेल तर तो लंडनमध्येच पाहायला हवा. हा वाढदिवस २३ ते २६ एप्रिलदरम्यान पुढील सहा  पद्धतीने साजरा केला जाणार आहे. 
१) १५६४ मध्ये शेक्सपिअरचा जन्म स्ट्रॅटफर्ड अ‍ॅव्हान येथील घरी झाला. त्या घराला भेट देऊन त्या घराचा संपूर्ण इतिहास तुम्हाला गाईडकडून जाणून घेता येईल.
२) या जन्मठिकाणी गेस्टबुकमध्ये स्वाक्षरी करता येईल, जे वर्षांतून केवळ एकदाच उघडले जाते. या पुस्तकाचे वैशिष्टय़ असे की, १८४७मध्ये त्यात प्रसिद्ध लेखक थॉमस हार्डी आणि चार्ल्स डिकन्स यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात तुमचाही समावेश करता येईल.
३) जन्मठिकाणाहून निघाल्यावर तुम्हाला शेक्सपिअर सर्वाधिक काळ ज्या ठिकाणी राहिला, जिथे बसून त्याने लेखन केलं त्या पूर्व लंडनची सैर करता येईल. २२ आणि २३ एप्रिलला सकाळी अकरा वाजता ही शेक्सपिअर वॉकिंग टूर सुरू होईल.
४) त्यानंतरचे ठिकाण असेल ग्लोब थिएटर दर्शन. १५९९ साली बांधलेल्या आणि शेक्सपिअरच्या अनेक नाटकांचे प्रयोग झालेल्या या थिएटरला भेट देणं हा संस्मरणीय अनुभव असेल. तिथे तुम्हाला हॅम्लेट हे नाटक नव्या प्रयोगात पाहता येईल.
५) ग्लोब थिएटरमध्ये असतानाच १५८७मध्ये बांधले गेलेले आणि लंडनमधील सर्वासाठी खुले असलेले हे एकमेव एलिझाबेथन प्लेहाऊस आहे. या प्लेहाऊसच्या इतिहासाचा १५ मिनिटांचा व्हिडीओही पाहण्याची सोय आहे. 
६) शेक्सपिअर ज्या ‘गॅरिक इन’ नावाच्या पबमध्ये बसून मद्यपानाची आस्वादयात्रा करत असे, त्या पबमध्ये बसून तुम्हालाही एक पेग मारता येईल.

हे  सर्व परवा मराठी दैनिक लोकसत्ता मध्ये वाचले आणि कौतुक वाटले आणि खेद झाला . खेद ते साजरा करतात म्हणून नाही तर आपल्या कडे अश्या आपल्या अलौकिक लोकांची स्मारके ज्या स्थितीत आहेत ती ऐकून किवा पाहून होते .  माझा एक मित्र  झाशी च्या राणी जन्म गावी ती महान स्त्री जन्मली तो किल्ला पाहण्यास गेला आणि त्याला 
रडूच आले . त्या किल्ल्याच्या भिंतीला लागून म्हणे गलिच्छ वस्ती आणि सार्वजनिक शौचालय बांधली आहेत . किल्ला 
पडत आला आहे , त्यात रानटी झाडे उगवली आहेत 

मध्ये  एका मराठी वाहिनीने  शिवाजी महाराज आग्र्याहून कसे मोगलांना चकवून निघाले आणि त्या आधी कुठल्या वाड्यावर  राहिले हे दाखवले …. त्या वाड्याची अवस्था आणि आजूबाजूची वस्ती पाहून खूप वाईट वाटले …. अश्या पराक्रमी वीराने , आपल्याला क्रूर मोगलापासून सतत वाचवले , ज्याच्या नावावर आजचे राजकारणी सत्ता भोगतात त्यांना असे का वाटले नाही कि महाराज जिथे जिथे राहिले त्याच्या आजूबाजूची जागा विकत घेऊन स्मारक म्हणून 
जपून ठेवावेत ?  हजार पंधराशे कोटी खर्च करून समुद्रात भर टाकून पुतळे उभे करण्याऐ वजी असे काही का करीत नाहीत ?  वर सांगितलेले शेक्स्पिअर  ची सुंदर जत्रा हे गोरे लोक भरवतात आणि जगातल्या असंख्य  लोकांना भेट देण्यास प्रोत्साहित करतात . त्यात  पर्यटन वाढवीत आहेत 

असे का आपण करीत नाही ?   

अगदी अलीकडे आपण विक्रांत  युधनौकेची ची करुण कहाणी वाचली .  शोकांतिका आहे कि या शूर वीर बोटीला भंगार म्हणून विकायला  निघालो आहोत …… आपल्याला शरम सुद्धा वाटत नाही याचा खेद वाटतो  आणि आपण काही करू शकत  नाही याचे शल्य वाटत राहते 

Saturday, 1 March 2014

Why this happens only in AMERICA


मी  इंटरनेट सर्फिंग करत असताना अचानक  फर्स्ट पोस्ट कडून एक बातमी झळकली …तारीख होती १९ फ़ेब्रुअरि  २०१४ … व्हाटसअप  , हे जगातले सर्वात लोकप्रिय चाट साधन  फेसबुक हे आणखी एक तितकच लोकप्रिय सोशल मेडिया कंपनी ने १९बिलियन  अमेरिकन डॉलर्स  विकत घेतले . ऐकून आश्चर्याचा  धक्काच बसला पण अशा गोष्टी अमेरिकेतच होऊ शकतात यावर शिक्का मोर्तब झाले .   2 कोटी अमेरिकन डॉलर् उलाढाल असलेली एक कंपनी तब्बल १९ बिलियन  डॉलर ला विकली गेली . असे कुठे होऊ शकेल का ?

अमेरिकेची एक खासियत आहे . माणूस कुठून आला , त्याचा रंग काय आहे , भाषा कशी बोलतो ह्याच्याशी काही देणे घेणे नाही जोपर्यन्त ती व्यक्ती काही विशेष कार्य करते आणि त्यातून काही नवा व्यवसाय करते , त्याचे खूप कौतुक होते , अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देते . अशी खूप उदाहरणे आपल्याला माहीत असतील . अमेरिकेत आपला देश सोडून आलेली कित्येक माणसे तेथील वातावरण आणि केवळ गुणाला प्राधान्य देण्याच्या समाज व्यवस्थेमुळे नावारूपाला आली आणि अमाप पैसा मिळवून यशस्वी झाली . पटकन खूप नावे डोळ्यापुढे येतात .

 रॉबर्ट  ओवेन सारख्या माणसाने पर्सोनेल व्यवस्थापन प्रथम सुरवात केली . आज या क्षेत्रात खूप प्रगती होऊन माणसाच्या विकासात खूप क्रांती झाली ., हेनरी फोर्ड १ , सारखा सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाला सतत मोटार बनवण्याचा ध्यास होता म्हणून मिशिगन येथील वेस्टिंग हाउस सारख्या रेल्वे इंजिन बनवणाऱ्या कारखान्यात काम केले आणी १९०८ साली जगप्रसिध्द "टी  मॉडेल बाजारात आणले आणी क्रांती घडवली आणि  असेंब्ली लाईन या कल्पनेचा शोध लाऊन प्रचंड पैसा कमवला ,प्रसिध McDonald  साम्राज्याचे जनक रिचर्ड आणि मॉरीस अतिशय सामान्य घरात जन्मले आणि घरातील गरीबीवर मात करण्यासाठी कॅलीफोर्नियातील  पासाडोना या गावात आपल्या वडापावा सारखेच हॉट डॉग विकण्या साठी छोटा ठेला टाकला . पण त्यात स्वच्छता वाखाण्यासारखी होती मग पुढे घडला तो इतिहास …।आज १२० देशात ३४००० हून अधिक दुकाने , १८ दश्लक्ष लोकांना रोजगार आणि अंदाजे २७ बिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ २७०० कोटी रुपये , डिस्ने सुद्धा  सामान्य घरातून आला होता  , कोकाकोला चा जनक जॉन  पिम्बरटन , फेडेक्स चा फ्रेड स्मिथ ,  सर्वांचा आवडता  स्टीव जॉब्स  आणि असंख्य उदाहरणे आहेत .   ही सर्व मंडळी कर्तुत्व आणि त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करून  जगप्रसिद्ध संस्था करू शकले …।  आपल्या कडेही असे शून्यातून वर आलेले उद्योजक झाले पण जागतिक पातळीवर फार थोडे …. धीरूभाई अंबानी , टाटा समूह , बिर्ला समूह आहेत . 

 व्हाटसअप  ,  ची कहाणी तर खूपच चुरस आहे   २ कोटी डॉलर कंपनी चक्क १९०० कोटी डॉलरला  विकली गेली   


 .   
सर्वाना आवडणारे 
व्हाट अप्स चे सं स्थापक  कोम  आणि ब्रायन 









कोम हा पूर्वीच्या सोविएत रशियात, युक्रेन प्रांतात , जन्मला . कम्युनिस्ट रशियात आपल्या हिंदी म्हणजे बॉलीवूड सिनेमाना प्रचंड लोकप्रियता मिळत असे . ज्यांन  कोम लहान असताना असाच आपल्या हिंदी चित्रपटाचा चाहता होता . त्यांनी म्हणे मिथुन चक्रवर्तीचा  डिस्को डान्सर हा चित्रपट तब्बल २० वेळा पहिला म्हणे !! त्याला म्हणे भारतात १०० कोटी उजर्स तयार करायचे आहेत . ह्या  चित्रपटाचा नायक अनिल किवा जिम्मी जसा गरिबीतून झगडत मोठा होतो , तसच काहीसे कोम च्या आयुष्यात सुद्धा झाले [ आपण ताबडतोब तुलना करण्यात माहीर आहोतच ]. 

वयाच्या १६ वर्षा पर्यंत रशियात अतिशय हलाखीत काढले . एवढे कि कडाक्याच्या थंडीत गरम पाणी घेण्याची आर्थिक कुवत नव्हती. आईने गाशा गुंडाळून अमेरिकेत मौन्टन व्हिऊ गाठले  . वडिलांना नोकरी मिळेना म्हणून आई मुलांना सांभाळण्याची कामं करू लागली तर दुकानात साफसफाई च  काम करू लागला . दुर्दैवाने आईला कॅन्सर झाल्यावर केवळ बेकारी भत्त्यावर राहावे लागले . कॉम्पुटर वर काम करता करता तो  एका hacker group मध्ये काम करू लागला . दिवसभर  Sanhoje युनिव्हरसिटीत अभ्यास तर रात्री Software Security Assistant म्हणून काम करायचा . मग याहू मध्ये नोकरी सुरु राहिली . तिथे ब्रायन भेटला . पुढे याहू मध्ये चढ उतार आणि त्यांनी २००० मध्ये डॉट कॉम बबल मध्ये बुडालेले पैसे याला कंटाळून दक्षिण  अमेरिकेत भटकंती करण्यास निघून गेले आणि आल्यावर  फेसबुक कंपनीत नोकरीला गेले पण तिथे त्यांना नोकरी मिळाली नाहीच .  नशिबाचे फासे कसे असतात ते बघण्यासारखे असतात …… आज त्याच फेसबुक त्यांना १९०० कोटी डॉलर्स  देऊन आपल्यात सामाऊन घेतले आणि Jan Kom ला संचालक बोर्डावर घेतले आहे. 

 २००९ साली कोम आणि ब्रायन यांनी आय फोन साठी काही applications तयार करण्याच्या खटपटीत लागले . त्यावेळेस स्काइप  किवा बिबिम घेण्यासाठी खूप कठीण पद्धत असे म्हणून या दोघांनी सोपी पद्धत चालू केली ज्यातून तुमच्या फोन वरून कुठल्या नंबर वर मेसेज पाठवू शकणारी .   नाव सुद्धा सोपे असावे असे ठरले …। आपण जसे म्हणतो WHATs UP ?  म्हणून त्यांनी  त्याचे नाव whats app असे ठेवले . थोड्याच काळात हे खूप लोकांना आवडू लागले . आजची आकडेवारी पहिली कि समजते कि लोकप्रिय आहे 
 ४० कोटी  लोक व्हाट्स एप  वापरतात , असे म्हणतात कि फेसबुक वरचे बरेच उजर्स व्हाटस अप कडे वळू  लागले . त्याची धास्ती फेसबुक नि घेतली  आणि पुढचे सर्व घडले . असे सांगितले मार्क झुबर्मान ने कोम आणि ब्रायन ला लॉस अल्टोस मधील कॉफी शॉप मध्ये भेट घेऊन विकत घेण्याचा प्रस्ताव ९ फ़ेब्रुअरि ला ठेवला …। नंतर काही भेटी नंतर १९ फ़ेब्रुअरि ला डीलवर जगातल्या ऐतिहासिक विक्री पूर्ण झाली …… 
खऱ्या अर्थाने रंका चा राव झाला ही म्हण खरी ठरली ......

एका मुलाखतीत कोम म्हणतो 

what advice would you give to entrepreneurs 
" Focus , Many times people start out with a lot of good  ideas, but then they dont execute them , They lose the purity of their  vision. They end up running round circles.Hire smart people , smart engineers . Focus on users from day one "  


आपला देश असे काही जगाला केव्हा देईल याची वाट पाहू . आपल्या कडे प्रचंड बुद्धिवान माणसे आहेत . नुकतेच असे वाचले कि ( आणि ही दुबई त वाचली , म्हणजे जगात सर्वत्र वाचली गेली असेल ) आपले डॉ थत्थे , जे पुण्यात शिकले आणि गेली २० वर्षे हार्वर्ड मेडिकल केंद्रात संशोधन करीत आहेत , यांनी एक रसायन तयार केले आहे ज्यामुळे Brain Dead झालेल्या माणसाचे अवयव जास्ती दिवस ठेवू शकतात . ह्यांनी क्रांती होणार आहे .

आपल्या कडील लालफीत आणि लाचखोर संस्कृती समुद्रात बुडवल्या खेरीज अमेरिके प्रमाणे जगनमान्य  सेवा किवा प्रॉडकट्स तयार करूच शकणार नाही हे खरे .    



     














       

Thursday, 20 February 2014

Leadership makes the difference

काल आम्ही जगातल्या सर्वात उंच अश्या इमारतीस भेट दिली . ती इमारत म्हणजे दुबईतील बुर्ज खलिफा .अप्रतिम  असे एका नेत्याने बघितलेल्या विजन [vision] चं  प्रतय्काशात  आणलेले सुंदर आणि विलक्षण उदाहरण म्हणावे लागेल.




दुबई  हा      अतिशय छोटा देश आहे . लोकसंख्या आणि आकाराने सुद्धा !!पसरलेली वाळू आणि तेल किवा पाण्याचा अभाव अश्या  अतिशय कठीण वातावरणात आज जगातील श्रीमंत राष्ट्रा मध्ये गणंना होते. जगातील सर्व भागातील व्यापारी इथे गुंतवणूक करण्यास उस्तुक असतात . मग फ्रांस मधील गालेरिया लाफार्ते असो किवा अर्मानी असो जगात फक्त त्यांच्या देशाखेरीज शाखा दुबईत उघडतात . काय  कारण असावे ?   कारण एकाच इथला राजा एखाद्या यशस्वी कॉर्पोरेट सीईओ प्रमाणे राज्य चालवतो . इथली प्रजा आणि काम करणारे लोक , गुंतवणूकदार , पर्यटक  हे सर्व त्याचे ग्राहक आहेत , त्यांच्या सोयी पाहण्यात  सर्व यंत्रणा चोख  काम पाहत असते .त्याची दृष्टी खूप दूर आहे .  बुर्ज खलिफा वर एका ठिकाणी त्यांनी  खालील मजकूर लिहला आहेत्यात तो म्हणतोय कि प्रत्येक टप्प्यावर  बारकाईने लक्ष देऊन सर्व देशांना बरोबर घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील सर्वात  मोठी इमारत कि ज्यामध्ये सर्वे देशाचे व्यावसायिक काम करतील  . अनेक देशातील सधन लोक आपली घरे करू शकतील  . त्यामुळे कित्येक लोकांना रोजगार  मिळेल . वगैरे .
 गेली सात आठ वर्षे मी दुबईला येउन जात आहे . प्रत्येक वेळी ह्या छोट्या देशाच्या व्यवस्थापने चकित होतो आणि एक प्रश्न टोचतो , हे सर्व आपल्या देशात का होत नाही . ? आपल्या देशात निसर्ग आपल्या बाजूने आहे , अतिशय हुशार माणसे प्रत्येक क्षेत्रात आहेत  मग असे का ?  बुर्ज खलिफा सारखी इमारत ते पर्यटन स्थळात बदलून टाकतात . तिकीट काढण्यापासून ते १२० व्या मजल्यावर जाईपर्यंत सर्वे शांत आणि प्रसन्न पणे करतात . मोजून ३/४ स्टाफ सर्व शांत पणे असंख्य पर्यटक हाताळीत होते  . सुरक्षा आपल्या सारखी गचाळ आणि बटबटीत नव्हती कोठेही वैतागलेले सुरक्षा कर्मचारी लोकांची झडती घेत
नव्हते. ………। हे सर्व आपल्या कडे का होत नाही . का आपल्या कडे सुरक्षा सामान्य माणसा ना त्रास आणि उच्च पदास्थ, राजकीय नेत्यांना ,अधिकाऱ्यांना  चांगली वागणूक ………इथे सर्व सारखे . आपल्या कडे  ताज , अजंठा  इथ जा . कुठेही  किती लोक येतील याचा विचार नसतो त्यामुळे कुठेही लोकांना नैसर्गिक विधी साठी सोयी नसतात त्यामुळे सर्वत्र अस्वछ आणि दुर्गंधी .  वृद्ध किवा अपंग लोकांना काही सोयी नसतात . बुर्जवर  सर्व स्वछ  वॉशतिप्पट रूम्स , व्हीलचेर्स वृद्ध किवा अपंग लोकांसाठी …….  हे का आपण करू शकत नाही ?   मग लक्षात येते कि राज्य कर्त्यांना प्रजेची काळजी पाहिजे , त्यांना दूरदृष्टी असावी लागते .  शिवाय कुठलाही प्रोजेक्ट वेळेवर संपवणे हे इथल्या राज्यकर्त्यांना  चांगले जमते .  त्यामुळे खर्च वाढत नाहीत , लाचखोरीला थारा मिळत नाही …।  त्याचा सामान्य माणसाला फायदा होतो .   बुर्ज ची माहिती आश्चर्य चकित करणारी आहे  त्यांच्या वेब साईट  वर आहे
१) ह्या उतुंग इमारीतीची उंची ८२८ मीटर्स किवा २७१६.५ फुट आहे .सांगायचे झालेच तर फ्रांस च्या आईफेल टावर च्या तीनपट किवा अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डींग च्या दुप्पट उंचीची आहे 
२)वापरलेले कॉक्रिट एकूण एक लाख हत्तींच्या वजनाइतके होते 
३)१५ दशलक्ष ग्यालन पाणी दरवर्षी riclyle केले जाते 
४)जगातील सर्वात सलग चालणारी लिफ्ट १४० मजले नथांबता प्रेक्षक ग्यालरीत घेऊन जाते या लिफ्ट चा वेग १० मीटर प्रती सेकंद आहे . मोजून एक मिनिटात तुम्ही १४०व्या मजल्यावर जाता . 
५) १२००० कामगार आणि कर्मचारी यांनी सहा  वर्षात इतकी सुंदर आणि भव्य वास्तु तयार केली
६)११००० टन कॉनक्रीट आणि ५५००० टन स्टील वापरात आले . 
७) पाया पासून उद्घाटनास फक्त सहा वर्ष लागली . मनात विचार येतो आपल्या कडे किती रखडला असता असा उपक्रम ? शिवाय एखाद्या निरुपयोगी नेत्यासाठी उद्घाटन विलम्बले असते ते निराळच !!!!! किवा नाव कुणाचे द्यायचे यासाठी भांडणे निराळीच ८)२५००० लिटर्स पाणी प्रतीदिनी   १०० किलोमीटर पाईप्स मधून रोज वापरले 
जाते 
९) तुम्ही बाहेर पडता तेव्हा कामगारा पासून उच्च अधिकारी ज्यांनी या बांधकामात सहभाग घेतला त्यांचे नावासह  फोटो लावले आहेत . अगदी सफाई कामगारा पासून . बरेच भारतीय लोक आहेत . बांधकाम कोरियाच्या समसंग ने  केले आहे . आपली  हिंदुस्तान कॉन्स्त्रशन किवा एलेन्टी चे  नाव शोधत होतो !!
एवढा मोठा व्याप हे लोक आधुनिक तंत्रज्ञान वापरून लीलया हाताळत होते . येणारे हजारो लोक हसत मुखाने एथील कमीतकमी कर्मचारी हाताळत होते . 
आपल्या सारख्या मोठ्या देशात , जिथे गुणी लोक कमी नाहीत , तिथे असे का होत नाही ? ही चुटपूट लागत होती . 
विचार केल्यावर जाणवते , की  इथले नेतृत्व अतिशय वेगळे आहे . इथे देशाचा , इथल्या प्रत्येक राष्ट्रीय संपतीचा खूप अभिमानाने काळजी घेतात .  मग मी जेव्हा विचार करतो कि आपले नेते , अधिकारी करदात्याच्या पैशावर परदेशी जातात तेव्हा हे अनुभव घेत नाहीत का ?  कि वैयक्तिक लाभापुढे काही नाही ?
इथे किवा प्रगत राष्ट्रात जेव्हा एखादा मंत्री किवा प्रधान मंत्री रस्त्याने जातात तेव्हा सामान्य माणसाना वेठीस धरत नाहीत . आपल्या कडे कुणी फडतूस नेता गेला तरी पूर्ण वाहतूक अडवून ठेवतात   , कधीतरी हे थांबेल . आणि नागरिकांना , पर्यटकांना ग्राहकराजा सारखे वागवले जाईल 

नुकतच एका ठिकाणी ब्रिटीश पंतप्रधान गाडीतून वर्तमान पत्र चक्क उभे राहून वाचत जाताना दिसले . महत्वाची बाब म्हणजे कुठेही सुरक्षा रक्षक नाहीत , आजूबाजूला प्रवासी शांत पणे बसलेले दिसतात 



१२१ व्या मजल्यावरून काही फोटो घेतले ते टाकत आहे 



         

We take life so much for granted ?

दोन दिवसापूर्वी सकाळी बातमी आली कि माझी प्रिय वाहिनी हे जग सोडून अचानक निघून गेली . काही क्षण मन सुन्न झाले आणि जाणवलं कि  कित्येक गोष्टी , नाती आपण आयुष्यात गृहीत धरून चालतो . जवळपास ४५ वर्षे तिचे माझ्या आयुष्यात असणे मी गृहीत धरून होतो . मला आठवले कि मी शाळेत असताना ती आमच्या घरात सून म्हणून आली मी शाळेत होतो आणि ती तेव्हापासून माझी बहिण , आई  मित्र सर्व काही झाली . आमच्या घरात आम्हा पाच भावंडाना आई खेरीज कुठल्याही स्त्री चा वावर माहीतच नव्हता त्यामुळे वाहिनीचे आमच्या घरी येणे एक नवीन नात्याचे अप्रूप होतो  ……तिने सुद्धा पहिल्या दिवसापासून आपल्या मोकळ्या वागण्याने आम्हा सर्वाना प्रेम दिले . मी तर तिच्याबरोबर मुंबईला शिकायला आलो  . तेव्हा पासून अगदी परवा कायमचे सोडून जाण्यापूर्वी मुलाप्रमाणे प्रेम केले . माझ्या आजारपणात काळजी घेतली , देवाकडे साकडे घातले .

मला प्रथम Management Trainee म्हणून नोकरी मिळाली तेव्हा किती अभिमानानी सुंदर घड्याळ आणि ब्रीफ केस आणून अभिमानाने दिली  . सकाळी पाच वाजता उठून डबा  करून द्यायची …। हे सर्व करताना आनंद ओसंडून जात असे .  माझ्या करियर करण्यात तिचा वाटा  सिंहाचा !!!

आज फक्त आठवणी दाटून येतात . वाटते माणूस असतो तोपर्यंत त्याच्या असण्याची किमंत आपल्याला कळत  नाही …।  पण नसल्यावर किती मोठी किंमत चुकवली याची जाणीव होते जरी आपल्याला माहित असते येणारी व्यक्ती जाणार असतेच .

अश्या प्रेमळ वाहिनीला श्रद्धांजली !