मी इंटरनेट सर्फिंग करत असताना अचानक फर्स्ट पोस्ट कडून एक बातमी झळकली …तारीख होती १९ फ़ेब्रुअरि २०१४ … व्हाटसअप , हे जगातले सर्वात लोकप्रिय चाट साधन फेसबुक हे आणखी एक तितकच लोकप्रिय सोशल मेडिया कंपनी ने १९बिलियन अमेरिकन डॉलर्स विकत घेतले . ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला पण अशा गोष्टी अमेरिकेतच होऊ शकतात यावर शिक्का मोर्तब झाले . 2 कोटी अमेरिकन डॉलर् उलाढाल असलेली एक कंपनी तब्बल १९ बिलियन डॉलर ला विकली गेली . असे कुठे होऊ शकेल का ?
अमेरिकेची एक खासियत आहे . माणूस कुठून आला , त्याचा रंग काय आहे , भाषा कशी बोलतो ह्याच्याशी काही देणे घेणे नाही जोपर्यन्त ती व्यक्ती काही विशेष कार्य करते आणि त्यातून काही नवा व्यवसाय करते , त्याचे खूप कौतुक होते , अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देते . अशी खूप उदाहरणे आपल्याला माहीत असतील . अमेरिकेत आपला देश सोडून आलेली कित्येक माणसे तेथील वातावरण आणि केवळ गुणाला प्राधान्य देण्याच्या समाज व्यवस्थेमुळे नावारूपाला आली आणि अमाप पैसा मिळवून यशस्वी झाली . पटकन खूप नावे डोळ्यापुढे येतात .
रॉबर्ट ओवेन सारख्या माणसाने पर्सोनेल व्यवस्थापन प्रथम सुरवात केली . आज या क्षेत्रात खूप प्रगती होऊन माणसाच्या विकासात खूप क्रांती झाली ., हेनरी फोर्ड १ , सारखा सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाला सतत मोटार बनवण्याचा ध्यास होता म्हणून मिशिगन येथील वेस्टिंग हाउस सारख्या रेल्वे इंजिन बनवणाऱ्या कारखान्यात काम केले आणी १९०८ साली जगप्रसिध्द "टी मॉडेल बाजारात आणले आणी क्रांती घडवली आणि असेंब्ली लाईन या कल्पनेचा शोध लाऊन प्रचंड पैसा कमवला ,प्रसिध McDonald साम्राज्याचे जनक रिचर्ड आणि मॉरीस अतिशय सामान्य घरात जन्मले आणि घरातील गरीबीवर मात करण्यासाठी कॅलीफोर्नियातील पासाडोना या गावात आपल्या वडापावा सारखेच हॉट डॉग विकण्या साठी छोटा ठेला टाकला . पण त्यात स्वच्छता वाखाण्यासारखी होती मग पुढे घडला तो इतिहास …।आज १२० देशात ३४००० हून अधिक दुकाने , १८ दश्लक्ष लोकांना रोजगार आणि अंदाजे २७ बिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ २७०० कोटी रुपये , डिस्ने सुद्धा सामान्य घरातून आला होता , कोकाकोला चा जनक जॉन पिम्बरटन , फेडेक्स चा फ्रेड स्मिथ , सर्वांचा आवडता स्टीव जॉब्स आणि असंख्य उदाहरणे आहेत . ही सर्व मंडळी कर्तुत्व आणि त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करून जगप्रसिद्ध संस्था करू शकले …। आपल्या कडेही असे शून्यातून वर आलेले उद्योजक झाले पण जागतिक पातळीवर फार थोडे …. धीरूभाई अंबानी , टाटा समूह , बिर्ला समूह आहेत .
व्हाटसअप , ची कहाणी तर खूपच चुरस आहे २ कोटी डॉलर कंपनी चक्क १९०० कोटी डॉलरला विकली गेली
.
![]() |
| सर्वाना आवडणारे |
![]() |
| व्हाट अप्स चे सं स्थापक कोम आणि ब्रायन |
कोम हा पूर्वीच्या सोविएत रशियात, युक्रेन प्रांतात , जन्मला . कम्युनिस्ट रशियात आपल्या हिंदी म्हणजे बॉलीवूड सिनेमाना प्रचंड लोकप्रियता मिळत असे . ज्यांन कोम लहान असताना असाच आपल्या हिंदी चित्रपटाचा चाहता होता . त्यांनी म्हणे मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर हा चित्रपट तब्बल २० वेळा पहिला म्हणे !! त्याला म्हणे भारतात १०० कोटी उजर्स तयार करायचे आहेत . ह्या चित्रपटाचा नायक अनिल किवा जिम्मी जसा गरिबीतून झगडत मोठा होतो , तसच काहीसे कोम च्या आयुष्यात सुद्धा झाले [ आपण ताबडतोब तुलना करण्यात माहीर आहोतच ].
वयाच्या १६ वर्षा पर्यंत रशियात अतिशय हलाखीत काढले . एवढे कि कडाक्याच्या थंडीत गरम पाणी घेण्याची आर्थिक कुवत नव्हती. आईने गाशा गुंडाळून अमेरिकेत मौन्टन व्हिऊ गाठले . वडिलांना नोकरी मिळेना म्हणून आई मुलांना सांभाळण्याची कामं करू लागली तर दुकानात साफसफाई च काम करू लागला . दुर्दैवाने आईला कॅन्सर झाल्यावर केवळ बेकारी भत्त्यावर राहावे लागले . कॉम्पुटर वर काम करता करता तो एका hacker group मध्ये काम करू लागला . दिवसभर Sanhoje युनिव्हरसिटीत अभ्यास तर रात्री Software Security Assistant म्हणून काम करायचा . मग याहू मध्ये नोकरी सुरु राहिली . तिथे ब्रायन भेटला . पुढे याहू मध्ये चढ उतार आणि त्यांनी २००० मध्ये डॉट कॉम बबल मध्ये बुडालेले पैसे याला कंटाळून दक्षिण अमेरिकेत भटकंती करण्यास निघून गेले आणि आल्यावर फेसबुक कंपनीत नोकरीला गेले पण तिथे त्यांना नोकरी मिळाली नाहीच . नशिबाचे फासे कसे असतात ते बघण्यासारखे असतात …… आज त्याच फेसबुक त्यांना १९०० कोटी डॉलर्स देऊन आपल्यात सामाऊन घेतले आणि Jan Kom ला संचालक बोर्डावर घेतले आहे.
२००९ साली कोम आणि ब्रायन यांनी आय फोन साठी काही applications तयार करण्याच्या खटपटीत लागले . त्यावेळेस स्काइप किवा बिबिम घेण्यासाठी खूप कठीण पद्धत असे म्हणून या दोघांनी सोपी पद्धत चालू केली ज्यातून तुमच्या फोन वरून कुठल्या नंबर वर मेसेज पाठवू शकणारी . नाव सुद्धा सोपे असावे असे ठरले …। आपण जसे म्हणतो WHATs UP ? म्हणून त्यांनी त्याचे नाव whats app असे ठेवले . थोड्याच काळात हे खूप लोकांना आवडू लागले . आजची आकडेवारी पहिली कि समजते कि लोकप्रिय आहे
४० कोटी लोक व्हाट्स एप वापरतात , असे म्हणतात कि फेसबुक वरचे बरेच उजर्स व्हाटस अप कडे वळू लागले . त्याची धास्ती फेसबुक नि घेतली आणि पुढचे सर्व घडले . असे सांगितले मार्क झुबर्मान ने कोम आणि ब्रायन ला लॉस अल्टोस मधील कॉफी शॉप मध्ये भेट घेऊन विकत घेण्याचा प्रस्ताव ९ फ़ेब्रुअरि ला ठेवला …। नंतर काही भेटी नंतर १९ फ़ेब्रुअरि ला डीलवर जगातल्या ऐतिहासिक विक्री पूर्ण झाली ……
खऱ्या अर्थाने रंका चा राव झाला ही म्हण खरी ठरली ......
एका मुलाखतीत कोम म्हणतो
what advice would you give to entrepreneurs
" Focus , Many times people start out with a lot of good ideas, but then they dont execute them , They lose the purity of their vision. They end up running round circles.Hire smart people , smart engineers . Focus on users from day one "
आपला देश असे काही जगाला केव्हा देईल याची वाट पाहू . आपल्या कडे प्रचंड बुद्धिवान माणसे आहेत . नुकतेच असे वाचले कि ( आणि ही दुबई त वाचली , म्हणजे जगात सर्वत्र वाचली गेली असेल ) आपले डॉ थत्थे , जे पुण्यात शिकले आणि गेली २० वर्षे हार्वर्ड मेडिकल केंद्रात संशोधन करीत आहेत , यांनी एक रसायन तयार केले आहे ज्यामुळे Brain Dead झालेल्या माणसाचे अवयव जास्ती दिवस ठेवू शकतात . ह्यांनी क्रांती होणार आहे .
आपल्या कडील लालफीत आणि लाचखोर संस्कृती समुद्रात बुडवल्या खेरीज अमेरिके प्रमाणे जगनमान्य सेवा किवा प्रॉडकट्स तयार करूच शकणार नाही हे खरे .

