आयुष्यात बऱ्याच गोष्टी जर योग्य वेळी प्रत्येकला मिळाल्या असत्या तर स्पर्धा , अपयश वगैरे अनुभवायला मिळाले नसते आणि आयुष्य खूपच अळणी वाटले असते . खूप झगडून मिळालेले यश हे परिपूर्ण आणि इतरांना मार्गदर्शक ठरू शकते . आपण प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करणारे लीडर पहिले आहेत . सगळेच काही नामवंत बिझिनेस स्कूल मध्ये शिकलेले नसतात . अनुभवाच्या विद्यापीठात खूप काही शिकवले जाते .
प्रश्न असा पडतो कि नेतृत्व गुण जन्मजात असतात कि ते रुजवले जातात ? मला असे वाटते कि नेतृत्व गुण किवा लीडर घडवला जातो . " Leadership is not a position but its a state of mind "
मी जेव्हा माझे करियर सुरु केले तेव्हा माहित नव्हते काय करायचे आहे ते . आमच्या वेळी IIM नुकते कुठे
सुरु झाले होते . त्यामुळे व्यवस्थापन फार महत्वाचे नसायचे इंजिनीयर , किवा मशीन वर काम करणाऱ्यांना संधी असत . त्यामुळे मला सुद्धा वाटायचे फक्त त्या क्षेत्राचि माहिती असली कि आपण corporate ladder वर जाऊ शकू . वयाची पस्तीशी ओलांडे पर्यंत ह्याच भ्रमात मी राहीलो . जेव्हा माझ्या IIM मध्ये शिकलेल्या बॉस नी दाखवून दिले कि Leader and experts are different …an expert need to be a leader but leader lead an expert .
लीडर होण्यासाठी खूप वेगळे गुण अंगीकारावे लागतात . त्याला आपल्या सहकारी टीम कडून काम करून घ्यावे लागते ते करताना निरनिराळ्या IQ Level असलेल्या , भावनावश लोकांच्या भावना समजून सर्वांना ठरलेल्या GOALS कडे घेऊन जायचे असते . ही तारेवरची कसरत असतेच . लीडर ला आपल्या लोकांना VISION दाखवून त्या दिशेने नेहले पाहिजे .
माझ्या अनुभवाप्रमाणे खालील पथ्ये पाळली पहिजेतच
१]तुमच्या लोकांवर प्रेम करा
अब्राहम लिंकन म्हणतात लोकांबद्दल प्रेम आणि नेतृत्व ह्या दोन्ही एकमेकापासून दूर होऊच शकत नाहीत .
ज्या संघटने मध्ये आपण काम करतो तेथील लोकांवर मनापासून प्रेम आणि आदर दाखवला पाहिजे
जो माणूस आपल्या लोकांवर विश्वास दाखवून काम करतो तो यशस्वी ठरलाच पाहिजे . कित्येक यशस्वी संघटना केवळ लोकांच्या उत्क्रुष्ठ सहभागामुळे अव्वल बनल्या आहेत . हळू हळू अधिकाधिक कंपन्या किवा संघटना लोकांवर लक्ष देत आहेत ,
२]नम्रता आणि खरोखरीची आत्मीयता
प्रत्येक लीडर ने त्याच्या संघातील व्यक्तीशी अत्मियतेनि काम केले पाहिजे . भगवान कृष्णाने तो जेव्हा अर्जुनाला उपदेश केला तेव्हा तो म्हणाला जे मी सांगितले ते काही माझे ज्ञान नव्हते , मी नवीन काही सांगितले नाही जे अनादी कालापासून माहीत तेच सांगितले .ह्या सांगण्यात त्याची विनम्रता दिसून येते
सर हिलरी आणि शेर्पा तेझिंग जेव्हा हिमालायाच्या अतुच्य एवरेस्ट शिखरा जवळ गेले तेव्हा सर हिलरी जे त्या मोहिमेचे नेते होते त्यांनी शेर्पाला सांगितले कि त्यांना फोटो काढावयाचा आहे आणि तेवढ्या साठी त्याला
जगातला पहिला मानव ज्याने एवरेस्ट वर पहिले पाऊल ठेवण्याचा मान मिळवून दिला ……. वास्तविक त्यांनी शेर्पाला फोटो काढण्यास सांगता आले असते . ह्या विन्रम लीडर नि आपल्या सहकाऱ्याला मान दिला .
गेल्या वर्षी आपल्या शास्त्रद्यानी खूप मेहनत घेऊन जगातील सर्वात स्वस्त अशी चंद्रयान मोहीम राबविली . त्याचे श्रेय इस्रोचे मुख्य यांनी सर्व शास्त्रद्याना देऊन एक आदर्श लीडर असल्याचे दाखवून दिले
३) "लिडिंग फ्रॉम फ्रंट " हा अतिशय मान्यताप्राप्त गुण आहे आणि तो सतत चांगल्या नेतृत्व असलेल्या माणसाबद्दल बोललं जातो . क्रिकेट जगतात महेंद्र सिंग धोनी सातत्याने सर्व संघाला आपल्या बरोबर घेऊन आणि प्रसंगी उत्कृष्ट खेळी करून वरील गुण दाखवून दिला आहे .
४) अपयशात सहकाऱ्यांना धीर देऊन दोष कुणावर ही न टाकता , मार्ग काढणारा
अपयश आल्यावर चटकन कुणाला तरी दोषी ठरवून आपली कातडी वाचवणे हि स्वाभाविक action समान्य माणसाची असते . पण अशावेळी स्वतः नेतृत्व कसे केले याचा विचार करणारे फार थोडे असतात आणि तेच खरे लीडर असतात . सुदैवाने मला असेच बॉसेस मिळाले .
या बाबतीत माजी राष्ट्रपती अब्दुल कलमांची एक गोष्ट सतत ऐकली जाते ती अशी कि यशाचे श्रेय त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिले पण अपयशाचे धनी स्वतः असल्याचे सांगितले . किती अप्रतिम नेतृत्व . म्हणूनच भारताने अवकाश तंत्रज्ञान आपल्या हिमतीवर केले
५) उत्तम संवाद साधणारा
आपण सार्वजनिक जीवनात पाहतो कि मोहनचंद करमचंद गांधी अतिशय सामान्य घरातून आलेल्या माणसाने करोडो लोकांशी कसा उत्तम संवाद साधून मने जिंकली आणि क्रांती केली . मी एका मोठ्या कंपनीत काम करीत होतो . माझ्यावर खूप मोठी जवाबदारी होती . सुमारे ५००० कर्मचारी होते पण कामगार युनियन नव्हती कारण सर्वांचा म्यानेजमेंट वर गाढ विश्वास होता . कारण एमडी उत्कृष्ठ पणे सवांद साधायचा . सर्व लोकांना बऱ्याच निर्णय प्रक्रियेत सामील करायचा . ……। काही कारणांनी नवीन एमडी आणला गेला जो अतिशय मितभाषी , संवाद न साधणारा असा होता . लोकांना "वरून " काही समजणे बंद झाला . लोक आपापल्या अनुभव आणि बुद्धी प्रमाणे त्याचा अर्थ काढू लागले . हळू हळू त्याचा परिणाम ग्राहकांना फटका बसू लागला . भीतीचे वातावरण पसरू लागले , परणीती युनियन मध्ये झाली . नवीन व्यवस्थापनाने मूळ समस्य्सा जाणून न घेता उपाय योजले . पुन्हा जुन्या एमडी आणि त्यांच्या टीमला पाचारण केले ……। एकदोन वर्षात गाडी रुळावर आली .
अगदी छोट्या कर्मचार्या पासून मोठ्या अधिकारावरील सर्वाना सारखी वागणूक आणि आलेल्या प्रत्येक मेल ,किवा पत्राला वेळेवर उत्तर देणे हा एक सतत संपर्कात राहण्याचा उत्तम मार्ग होता
६) सहानभूती पेक्षा प्रामाणिक राहून "एम्पथि " दाखवावी
प्रत्येक माणसाला प्रामाणिक माणसाबरोबर काम करायला नेहमीच आवडते तसेच सहानभूती दाखवलेली आवडत नाही . प्रामाणिक लीडर नेहमी नेहमी मदतीचा हात पुढे करून टीम ला बरोबर घेऊन जातो । स्टीवन कोवी ने ह्याला एक छान शब्द शोधून काढला आहे ज्याला तो "विन-विन " म्हणतो .
एक गोष्ट नक्की ………जो लीडर लोक हि मोठी शक्ती आणि assets मानतो , तोच किवा ती यशश्री मिळवू शकते
३]


