Search This Blog

Friday, 4 September 2015

BACK TO SCHOOL

BACK TO SCHOOL

खूप वर्षांनी परत , म्हणजे अगदी पन्नास साठ वर्षापूर्वी . त्यावेळी माझ्यासाठी . प्रचंड तणावाखाली . आता आठवत नाही कुणी सोडायला आले होते का ?पण तशी पध्दत नसायची . मोठा भाऊ किवा बहिण ज्या शाळेत जायची त्याचंच बोट धरून पाटी , बसायला एक बस्कुर असे घाबरत जात . मला आठवते कौलारू शाळा होती प्रचंड गलका आणि लाल टोपी आणि धोतर नेसलेले मास्तर होते  तेव्हा त्यांना आम्हाला गुरुजी म्हणायला सांगून भाऊ सोडून गेले . ………।  आणि परवा  माझ्या सहा वर्षाच्या नातवंडा - अवनी अनिश यांना सोडायला त्यांच्या पहिल्या दिवशी सोडायला गेलो होतो . शाळा छान चक्क स्वछ , ऐसपैस आणि वातानुकुलीत . सर्वच मुले  अगदी निराळ्या उत्साहात , एकादा सण साजरा केल्याप्रमाणे दिसत होती . सर्व जण आपापल्या जुन्या , म्हणजे केजी मधल्या मित्र मैत्रीणीना ……हाssssss य करत छान गळा भेट करत होते . आई वडील सुद्धा इतर पालकाशी तेच करत होते . सर्व कसे शिस्त बद्ध आणि छान चालू होते . 
छान कपडे , बूट सर्वे काही चकचकीत !
वर्ग  ऐसपैस , बसायला छान टेबले ,खुर्च्या ……. 

 नंतर टीचर आपापल्या वर्गाचा ताबा  घेत होत्या . आणि नवीन चमुशी ओळख करून घेत होत्या ……… परत मन जुन्या आठवणीत गेले .मास्तर  पन्नास एक मुलांच्या वर्गावर  ओरडून सांगत असत .  

आता  छोटी कुटुंबे , आई वडील आर्थिक बाबतीत बरेच चांगल्या स्थितीत त्यामुळे मुलांचे कोडकौतुक . त्यांना छान ब्यागा , छान टिफिन …।  आमच्या वेळेला कुटुंबे मोठी त्यामुळे आई वडिलांना हे सर्व करायला उत्साह नसायचं.  ……। पण त्याचा फायदा मुलांना स्वावलंबी बनण्यात व्हायचा 

पण  हा नवीन अनुभव  वेगळाच   होता . कदाचित नाती बदलली ,, मी पण कालानुसणार बद्लोलॊ म्हणून असेल . पण हा मोठा कौतुक सोहळा विलक्षण  आनंद  देणारा होता . हि चिमुकली आज पूर्वी पेक्षा जास्ती दबावा खाली असतात . त्यांना अभ्यास खूप करावा लागतो . त्यांना आय प्याड , ल्यापटोप वापरता येतो त्यमुळे  ज्ञानं खूप आहे . खेळ कमी व aps  जास्त ……। सर्वच गणित बदलले आहे .   एक निश्चित  हि मुले अतिशय चलाख आहेत   …… कालाय तस्मैः नमः  हेच खरे



No comments: