Search This Blog

Monday, 29 August 2016

आरोग्य आणि आपण


मला सतत वाटायचे कि आपलं वजन वाढलंय   आणि  BMI बिघडलाय वगैरे वाटत होते , तेव्हा माझा मित्र नारायणन  म्हणाला कि निसर्ग आपण जसे सतत विचार करत असतो त्याप्रमाणे  प्रोग्राम शरीरात घडवून आणतो , 

मी एका आहार तज्ज्ञाला गाठले , त्यांनी माझी कसून चौकशी करून म्हणाला तशी तुला गरज दिसत नाही पण आपण जेनेटिक प्रोफाइल करू म्हणजे  तुला काय चालते आणि काय चालत नाही . हे सर्व तुझ्या आई वडील यांच्या कडून आलेलं असते वगैरे .  माझी आई छान ९०  वर्षे जगली . अगदी आरोग्यमान आयुष्य जगली .  शेवट पर्यन्त खाण्यात कसलीच बंधने नव्हती .  मग आता हे कसले चोचले ?
मी विचार करू लागलो लागलो तेव्हा जाणवले कि तब्येतमान ( Health )आपल्या विचार आणि निसर्गाच्या  design  जुळवून घेण्यावर असते . माझी आई ते छान  करायची . 

मग मी विचार करू लागलो तेव्हा जाणवू लागले कि प्राणी कुठे एवढे आजारी पडतात .  प्राणी दात घासताना दिसत नाहीत कि त्यांना रूट कॅनल  करावे  लागत नाही ., आपण माणसांनी केलेले चक्रव्यूह आहे .  फक्त  अमेरिकेचे health budget पहिले डोळे चक्रावून जातात . त्या पैशात जगातील दारिद्यरेषेखालील सर्व लोकांचे तीन वेळा जेवणाची कायमस्वरूपी सोय होऊ शकेल .,  जगातील सर्व प्रगत देशात मरण किंवा खराब आरोग्य या भीतीने  ग्रासून सोडले आहे .. मग त्यावर सर्व इन्शुरन्स  कंपन्या भीती दाखवून  पैसे ओढून घेतात . खऱ्या अर्थाने LIfe  नसून Death इन्शुरन्स असतो तो . 

सर्व  शास्त्र किंवा आरोग्य शास्त्र बऱ्याच गोष्टी लपवून शरीराला नैसर्गिक प्रतिकार करण्याची  शक्ती घालवते असे वाटते .   आपण पाहतो मांजरे , कुत्रे  बरे नसलं कि खाणे सोडतात किंवा गवताची टोके खातात . त्याउलट आपण माणसे करीत असतो . 

सर्वाना चांगले आरोग्य  लाभो . 



Saturday, 20 August 2016

फिर भी दिल है " सिंधुस्थानी

"


काल १९ ऑगस्ट २०१६ , सारा देश रात्री आठ वाजल्यापासून टेलिव्हिजन सेट्स समोर खिळून बसला होता . प्रथमच क्रिकेट वेड्या लोकांनी दुसऱ्या खेळासाठी हृदयाचे ठोके धरून ठेवले होते . सर्व सोशल मीडिया सिंधुमय झाले होते . सचिन , बिद्रा बिग बी , पंतप्रधान , मुख्यमंत्री सर्व जण ट्विटर वर चिव चिव करीत शुभेच्छा देत होते .

२१ वर्षीय सिंधू  तिच्या पेक्षा अनुभवाने मोठ्या असलेल्या स्पेन च्या खेळाडूला शह देत होती आणि झुंज देत होती . ती विजया पासून  दूर जात होती पण पण सर्व भारतीय तिच्या पाठीमागे खंबीर पणे धीर देत होते . पराभवात देखील विजय साजरा करीत होते ,

१२० कोटी संख्या असलेल्या  देशात  जिथे मुलींना जन्मा आधीच मारणाऱ्या समाजाला आज  सिंधू , साक्षी  दीपा  या मुलींनी दाखवून दिले कि आम्ही देशाची मान उंचावतो आणि लाज सुद्धा राखतो !

रिओ  मध्ये खरच  दाखवून दिले कि  साक्षी चा  गुरु कुलदीप , दीपाचा गुरु बीसवेश्वर  आणि सिंधूचा गुरु गोपीचंद यांनी अति उकृष्ठ प्रशिक्षण दिले आणि या शिष्यां नि ते घेतले .  असेच इतर खेळातही व्हावं ,  आता सर्व जल्लोष कमी करून २०२० च्या टोकियो सामन्याची तयारी करावी .  चांगले मंत्री नेमून स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी  नेमुंन
तयारी करावी हि इच्छा . एवढ्या मोठ्या देशात अनेक गुणवान खेळाडू असतील त्यांना हेरून जागतिक खेळाडू सरकार आणि समाजाने बनवावेत ,




Reflection !!!!


काल संध्याकाळी एअरपोर्ट वर माझ्या नातवंडांना सोडायला गेलो होतो. जवळपास एक महिना जीव लावून काल आपल्या घरी निघून गेली . बघत होतो आजूबाजूला प्रचंड गर्दी . प्रत्येक माणसाला सोडायला खूप लोकांची गर्दी . सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव . लोक त्यांचा माणूस आत गेला तरी डोकावून पाहत होते . काही जण त्यांचा माणूस दिसला कि हात दाखवत " सांभाळून राहा" वगैरे सूचना दुरूनच पण बोलून सांगत होता . त्याला ऐकू जाण्याचा प्रश्नच नव्हता.

माझी नातं अवनी आणि नातू अनिश  खूप खुश होऊन पाठमोरे दिसत होते . त्यांचा उत्साह , आत्मविश्वास पाहून मला माझ्या लहानपणाचे प्रवास आठवले . आणि अंगावर काटे आले .  तेव्हा विमान प्रवास नसायचा . छोट्या मीटर गेज  गाड्या , छोटे प्लॅटफॉर्म्स आणि प्रचंड गर्दी ह्यांनी एक दडपण असायचे ,  काळा  कोट घातलेला टाय बांधलेला तिकीट चेकर ह्या सर्वांचे एक भयानक भीतीदायक वातावरण . त्यात दगडी कोळश्यांचा वास आणि भस भस  आवाज करीत येणारी वाफेची इंजिने .  त्यानी माझ्या पोटात गोळाच यायचा  तो अजूनही जात नाही .  बरे  रिझर्वेशन वगैरे कुणी करायचे नाहीत . त्यामुळे हमालाला सांगून घरातील मोठी माणसे जागा पकडायचे. मग आम्हा मुलांना अक्षरश; खेचून घ्यायचे . हे सर्व होताना माझा उत्साह किंवा आत्मविश्वास  हवेत गायब झाला तो अगदी मोठा  होईपर्यंत !  त्यामानाने  ही  सर्वच छोटी मुले किती चुणचुणीत आणि हुशार .  अनीश  मला सांगत  होता  " बाबा बिझनेस क्लास मध्ये ना तुम्हाला तुमची सी डी  लावून पाहता येते "  वगैरे !  पुन्हा माझे मन ३० वर्षा पूर्वी केलेल्या पहिल्या प्रवासाची , मस्कतला ,  गोंधलेल्या  स्थितीची  आठवण झाली .  एरपोर्टवर  खूप नातेवाईक सोडायला आले होते  .  त्या सर्वाना सोडून  आत गेल्यावर  प्रचंड दडपणात प्रवास केला. तेव्हा तर एयरपोर्ट म्हणजे जेल होते . जागोजागी पोलीस , अतिशय गलिच्छ वातावरण .... प्रवाशांची  गैरसोय कशी करता येईल याची सर्वच  जण जणू  खबरदारी घायचे !!!!  त्यातून परकीय चलन  फक्त २५ डॉलर् घेऊन जाण्याची परवानगी !

एका बाजूला हे सर्व बघून अचंबित  होतो पण पहिले हि छोटी मुले वयाच्या मानानी खूप लौकर  मोठी होतात . त्याना  आय पॅड , टॅब्लेट्स  वगैरे गॅजेटस  सहज वापरता येतात , गुगल करून अर्थ काढता येतात , आय ट्यून किंवा प्ले स्टोर मधून  खेळ डाउनलोड  करता येतात . किंडल  मध्ये पुस्तके शोधून  मला  विकत घेण्याचा हट्ट धरायचे   मी बघतो  आमच्या पिढीतल्या  कित्येक लोकांना याचा गंध सुद्धा नसतो .  या सर्व वातावरणात त्यांचे बालपण हरवले आहे हे निश्चित . मी जेव्हा  अवनी अनीश ला  बाहेर म्हणायचो तेव्हा चक्क  नाही म्हणायचे .  आमच्या सुट्टीत  आम्ही फक्त जेवणासाठी घरी यायचो . संध्याकाळी  क्रिकेट , रिंग टेनिस आणि मग दूर सर्व मित्र मिळून फिरायला जायचे .

पण एक निश्चित कि हि मुले ग्लोबल आहेत . प्रचंड हुशार आहेत  त्यांना नव्या आव्हानांची भीती नाही .






 ,