मला सतत वाटायचे कि आपलं वजन वाढलंय आणि BMI बिघडलाय वगैरे वाटत होते , तेव्हा माझा मित्र नारायणन म्हणाला कि निसर्ग आपण जसे सतत विचार करत असतो त्याप्रमाणे प्रोग्राम शरीरात घडवून आणतो ,
मी एका आहार तज्ज्ञाला गाठले , त्यांनी माझी कसून चौकशी करून म्हणाला तशी तुला गरज दिसत नाही पण आपण जेनेटिक प्रोफाइल करू म्हणजे तुला काय चालते आणि काय चालत नाही . हे सर्व तुझ्या आई वडील यांच्या कडून आलेलं असते वगैरे . माझी आई छान ९० वर्षे जगली . अगदी आरोग्यमान आयुष्य जगली . शेवट पर्यन्त खाण्यात कसलीच बंधने नव्हती . मग आता हे कसले चोचले ?
मी विचार करू लागलो लागलो तेव्हा जाणवले कि तब्येतमान ( Health )आपल्या विचार आणि निसर्गाच्या design जुळवून घेण्यावर असते . माझी आई ते छान करायची .
मग मी विचार करू लागलो तेव्हा जाणवू लागले कि प्राणी कुठे एवढे आजारी पडतात . प्राणी दात घासताना दिसत नाहीत कि त्यांना रूट कॅनल करावे लागत नाही ., आपण माणसांनी केलेले चक्रव्यूह आहे . फक्त अमेरिकेचे health budget पहिले डोळे चक्रावून जातात . त्या पैशात जगातील दारिद्यरेषेखालील सर्व लोकांचे तीन वेळा जेवणाची कायमस्वरूपी सोय होऊ शकेल ., जगातील सर्व प्रगत देशात मरण किंवा खराब आरोग्य या भीतीने ग्रासून सोडले आहे .. मग त्यावर सर्व इन्शुरन्स कंपन्या भीती दाखवून पैसे ओढून घेतात . खऱ्या अर्थाने LIfe नसून Death इन्शुरन्स असतो तो .
सर्व शास्त्र किंवा आरोग्य शास्त्र बऱ्याच गोष्टी लपवून शरीराला नैसर्गिक प्रतिकार करण्याची शक्ती घालवते असे वाटते . आपण पाहतो मांजरे , कुत्रे बरे नसलं कि खाणे सोडतात किंवा गवताची टोके खातात . त्याउलट आपण माणसे करीत असतो .
सर्वाना चांगले आरोग्य लाभो .

No comments:
Post a Comment