Search This Blog

Saturday, 20 August 2016

Reflection !!!!


काल संध्याकाळी एअरपोर्ट वर माझ्या नातवंडांना सोडायला गेलो होतो. जवळपास एक महिना जीव लावून काल आपल्या घरी निघून गेली . बघत होतो आजूबाजूला प्रचंड गर्दी . प्रत्येक माणसाला सोडायला खूप लोकांची गर्दी . सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव . लोक त्यांचा माणूस आत गेला तरी डोकावून पाहत होते . काही जण त्यांचा माणूस दिसला कि हात दाखवत " सांभाळून राहा" वगैरे सूचना दुरूनच पण बोलून सांगत होता . त्याला ऐकू जाण्याचा प्रश्नच नव्हता.

माझी नातं अवनी आणि नातू अनिश  खूप खुश होऊन पाठमोरे दिसत होते . त्यांचा उत्साह , आत्मविश्वास पाहून मला माझ्या लहानपणाचे प्रवास आठवले . आणि अंगावर काटे आले .  तेव्हा विमान प्रवास नसायचा . छोट्या मीटर गेज  गाड्या , छोटे प्लॅटफॉर्म्स आणि प्रचंड गर्दी ह्यांनी एक दडपण असायचे ,  काळा  कोट घातलेला टाय बांधलेला तिकीट चेकर ह्या सर्वांचे एक भयानक भीतीदायक वातावरण . त्यात दगडी कोळश्यांचा वास आणि भस भस  आवाज करीत येणारी वाफेची इंजिने .  त्यानी माझ्या पोटात गोळाच यायचा  तो अजूनही जात नाही .  बरे  रिझर्वेशन वगैरे कुणी करायचे नाहीत . त्यामुळे हमालाला सांगून घरातील मोठी माणसे जागा पकडायचे. मग आम्हा मुलांना अक्षरश; खेचून घ्यायचे . हे सर्व होताना माझा उत्साह किंवा आत्मविश्वास  हवेत गायब झाला तो अगदी मोठा  होईपर्यंत !  त्यामानाने  ही  सर्वच छोटी मुले किती चुणचुणीत आणि हुशार .  अनीश  मला सांगत  होता  " बाबा बिझनेस क्लास मध्ये ना तुम्हाला तुमची सी डी  लावून पाहता येते "  वगैरे !  पुन्हा माझे मन ३० वर्षा पूर्वी केलेल्या पहिल्या प्रवासाची , मस्कतला ,  गोंधलेल्या  स्थितीची  आठवण झाली .  एरपोर्टवर  खूप नातेवाईक सोडायला आले होते  .  त्या सर्वाना सोडून  आत गेल्यावर  प्रचंड दडपणात प्रवास केला. तेव्हा तर एयरपोर्ट म्हणजे जेल होते . जागोजागी पोलीस , अतिशय गलिच्छ वातावरण .... प्रवाशांची  गैरसोय कशी करता येईल याची सर्वच  जण जणू  खबरदारी घायचे !!!!  त्यातून परकीय चलन  फक्त २५ डॉलर् घेऊन जाण्याची परवानगी !

एका बाजूला हे सर्व बघून अचंबित  होतो पण पहिले हि छोटी मुले वयाच्या मानानी खूप लौकर  मोठी होतात . त्याना  आय पॅड , टॅब्लेट्स  वगैरे गॅजेटस  सहज वापरता येतात , गुगल करून अर्थ काढता येतात , आय ट्यून किंवा प्ले स्टोर मधून  खेळ डाउनलोड  करता येतात . किंडल  मध्ये पुस्तके शोधून  मला  विकत घेण्याचा हट्ट धरायचे   मी बघतो  आमच्या पिढीतल्या  कित्येक लोकांना याचा गंध सुद्धा नसतो .  या सर्व वातावरणात त्यांचे बालपण हरवले आहे हे निश्चित . मी जेव्हा  अवनी अनीश ला  बाहेर म्हणायचो तेव्हा चक्क  नाही म्हणायचे .  आमच्या सुट्टीत  आम्ही फक्त जेवणासाठी घरी यायचो . संध्याकाळी  क्रिकेट , रिंग टेनिस आणि मग दूर सर्व मित्र मिळून फिरायला जायचे .

पण एक निश्चित कि हि मुले ग्लोबल आहेत . प्रचंड हुशार आहेत  त्यांना नव्या आव्हानांची भीती नाही .






 ,

No comments: