आजच्या दिवशी मी देवाकडे माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम भेट दिल्याबद्दल नेहमीच आभार मानत असतो . तो दिवस म्हणजे अर्थातच माझ्या मुलीने - पूर्णिमा ने माझ्या आयुष्यात येण्याचा . मला २६ हा अंक हाच मुळी शुभांक ठरला . आयुष्यात सर्व महत्वाच्या घटना याच तारखेला झाल्या . असे म्हणतात मुलगी हि आयुष्यभर निरनिराळ्या रूपात आपल्या बरोबर असते . आज ती स्वतः छान आई आहे , दोन छान सुंदर मुलांची ,पण आई वडिलांची सुद्धा आई असल्या प्रमाणे काळजी घेते . तिच्या इतकी छान आई मिळणं कठीणच !
जगात मुलींचा जन्म नको म्हणणारे लोक किती करंटे आहेत याची कल्पना सुद्धा करवत नाही . त्यांनी आयुष्यात किती मोठा आनंद मुकला आहे याची त्यांना कल्पना नसते . मुलींना बोज समजणारे मूर्ख माणसे पाहिली की कीव करावीशी वाटते .
देवा कडे माझ्या मुलीला खूप आशीर्वाद दे , तिला छान माणूस म्हणून जगण्याची ताकद दे हीच प्रार्थना .!
तिचा लहानपणीचा फोटो अजूनही तोच आनंद देतो जो त्यावेळी मिळाला .
Happy birthday Dear Purnima and thanks for being there always
\

No comments:
Post a Comment