Search This Blog

Monday, 5 December 2016

आज पुन्हा वाढदिवस !

आज पुन्हा एकदा वाढदिवस ! माझे आप्तेष्ट , नातवंडे , मित्र सर्वानी शुभेच्छा दिल्या . खरे तर वयाला एवढी वर्षे झाली यात माझे काँट्रीब्युशन काहीच नाही . पण माझ्या जगण्याला खूप लोकांनी  हातभार लावला हे निश्चित . सर्व प्रथम ज्या आई वडिलांनी या जगात आणले आणि  कौतुकानी वाढवले , चांगले संस्कार दिले , चांगली भावंडे जी जीवापाड प्रेम करायची , चांगले गुरुजन ज्यांनी निर्मळ निरपेक्ष ज्ञान दिले नंतर खूप चांगले वरिष्ठ ज्यांनी सतत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले आणि आयुष्यात स्थिरता दिली . या सर्व प्रवासात पत्नी साथ दिली  आणि सतत खंबीर पणे पाठराखण केली ........


 पण मी काय दिले ?  पुलंची  छान  प्रार्थना आहे .  असे वागायची इच्छा होवो आणि जगण्याच्या प्रयत्नाला यश  येवो 

हे परमेश्वरा 

मला माझ्या वाढत्या वयाची  जाणीव दे 
बडबडण्याची माझी सवय कमी  कर 
आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललेच पाहिजे  हि  माझ्यातली अनिर्वाय इच्छा कमी कर 

दुसऱ्यांना सरळ करण्याची  जवाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खासगी प्रश्नांची दाखल घेऊन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊ देऊ नकोस !
टाळता येणारा फाफटपसारा व जरूर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ मुद्द्यावर येण्याची माझ्यात सवय कर !

इतरांची दुःख व  वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच पण त्यावेळी माझे तोंड शिवल्यासारखे बंद राहू दे !  अश्या प्रसंगी माझ्याच निराशा ,वैफल्याचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर !!!!

केव्हातरी माझीहि चूक ,घोटाळा , गैरसमजूत होऊ शकते याची जाणीव माझ्यात ठेव !

परमेश्वरा . अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा , गोडवा , लाघवीपणा राहूदे  

मी संत महात्मा नाही हे मला माहित आहेच  पण  बिलंदर बेरकी खडूस माणूस म्हणून मरू नये अशी प्रामाणिक इच्छा आहे ,!

विचारवंत होण्यास माझी हरकत नाही पण लहरी करू नकोस 

दुसऱ्यांना मदत आणि गरजवंतांना मदत करण्याची इच्छा जरूर दे पण त्यांच्यावर हुकूमत गाजवण्याची ,इच्छा मला देऊ नकोस 

शहाणपणाचा महान ठेवा फक्त माझ्याकडेच अशी माझी खात्री असून सुद्धा ज्याच्या कडे खरा सल्ला मागता येईल  असे मोजके का होईना पण चार मित्र दे 

आयुष्य  जगत असते तेव्हा "मी आणि माझे "या मध्ये गुंतून इतर सुंदर गोष्टी निसर्गाने दिलेल्या पहायाला वेळ नसतो पण  आता जाणवते वेळ निसटते आहे . अश्यावेळी पुलंची  वरील प्रार्थना फार उपयुक्त



No comments: