Search This Blog

Monday, 16 January 2017

NEW YEAR NEW HOPES

नेहमीप्रमाणे एक वर्ष संपण्यासाठी काही तास उरले आणि नेहमीप्रमाणे सर्व त्रास , जीवनातील कटकटी विसरून सर्व काही आलबेल असल्याप्रमाणे आपले लोक गोंगाट , कान बधीर करणारी गाणी लावून "आनंदाने "नव्या वर्षाचं स्वागत करायला लागली आहेत .  पण हया  गोंधळात आपले मुंबई पोलीस आयुक्त मदतीला धावून आले . मी त्यांना ट्विटर च्या माध्यमातून अमुक ठिकाणी कर्कश आवाजात गाणी लावून त्रास देत आहेत असे कळवले आणि पाच मिनिटात " कंट्रोल रूम action घेअसा  आहे " असा मेसेज आला .  आणि पुढील १५ मिनिटात आवाज कमी झाला . 

कमिशनर साहेब  धन्यवाद . 

पण आपली जनता असे का करते याचे आकलन होत नाही .  हीच मंडळी " फॉरीन मध्ये ध्वनी प्रदूषण नसते  किंवा शासन किती कठोर असते वगैरे तोंड फाटे पर्यंत कौतुक करतात , पण आपल्याकडे बरोबर उलटे !

नवीन' वर्षाच्या माझ्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा .



No comments: