काल आम्ही जगातल्या सर्वात उंच अश्या इमारतीस भेट दिली . ती इमारत म्हणजे दुबईतील बुर्ज खलिफा .अप्रतिम असे एका नेत्याने बघितलेल्या विजन [vision] चं प्रतय्काशात
आणलेले सुंदर आणि विलक्षण उदाहरण म्हणावे लागेल.
दुबई हा अतिशय छोटा देश आहे . लोकसंख्या आणि आकाराने सुद्धा !!पसरलेली वाळू आणि तेल किवा पाण्याचा अभाव अश्या अतिशय कठीण वातावरणात आज जगातील श्रीमंत राष्ट्रा मध्ये गणंना होते. जगातील सर्व भागातील व्यापारी इथे गुंतवणूक करण्यास उस्तुक असतात . मग फ्रांस मधील गालेरिया लाफार्ते असो किवा अर्मानी असो जगात फक्त त्यांच्या देशाखेरीज शाखा दुबईत उघडतात . काय कारण असावे ? कारण एकाच इथला राजा एखाद्या यशस्वी कॉर्पोरेट सीईओ प्रमाणे राज्य चालवतो . इथली प्रजा आणि काम करणारे लोक , गुंतवणूकदार , पर्यटक हे सर्व त्याचे ग्राहक आहेत , त्यांच्या सोयी पाहण्यात सर्व यंत्रणा चोख काम पाहत असते .त्याची दृष्टी खूप दूर आहे . बुर्ज खलिफा वर एका ठिकाणी त्यांनी खालील मजकूर लिहला आहे त्यात तो म्हणतोय कि प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष देऊन सर्व देशांना बरोबर घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील सर्वात मोठी इमारत कि ज्यामध्ये सर्वे देशाचे व्यावसायिक काम करतील . अनेक देशातील सधन लोक आपली घरे करू शकतील . त्यामुळे कित्येक लोकांना रोजगार मिळेल . वगैरे .
गेली सात आठ वर्षे मी दुबईला येउन जात आहे . प्रत्येक वेळी ह्या छोट्या देशाच्या व्यवस्थापने चकित होतो आणि एक प्रश्न टोचतो , हे सर्व आपल्या देशात का होत नाही .
? आपल्या देशात निसर्ग आपल्या बाजूने आहे , अतिशय हुशार माणसे प्रत्येक क्षेत्रात आहेत
मग असे का ?
बुर्ज खलिफा सारखी इमारत ते पर्यटन स्थळात बदलून टाकतात . तिकीट काढण्यापासून ते १२० व्या मजल्यावर जाईपर्यंत सर्वे शांत आणि प्रसन्न पणे करतात . मोजून ३/४ स्टाफ सर्व शांत पणे असंख्य पर्यटक हाताळीत होते
. सुरक्षा आपल्या सारखी गचाळ आणि बटबटीत नव्हती कोठेही वैतागलेले सुरक्षा कर्मचारी लोकांची झडती घेत
नव्हते. ………। हे सर्व आपल्या कडे का होत नाही . का आपल्या कडे सुरक्षा सामान्य माणसा ना त्रास आणि उच्च पदास्थ, राजकीय नेत्यांना ,अधिकाऱ्यांना चांगली वागणूक ………इथे सर्व सारखे . आपल्या कडे ताज , अजंठा इथ जा . कुठेही किती लोक येतील याचा विचार नसतो त्यामुळे कुठेही लोकांना नैसर्गिक विधी साठी सोयी नसतात त्यामुळे सर्वत्र अस्वछ आणि दुर्गंधी . वृद्ध किवा अपंग लोकांना काही सोयी नसतात . बुर्जवर सर्व स्वछ वॉशतिप्पट रूम्स , व्हीलचेर्स वृद्ध किवा अपंग लोकांसाठी ……. हे का आपण करू शकत नाही ? मग लक्षात येते कि राज्य कर्त्यांना प्रजेची काळजी पाहिजे , त्यांना दूरदृष्टी असावी लागते . शिवाय कुठलाही प्रोजेक्ट वेळेवर संपवणे हे इथल्या राज्यकर्त्यांना चांगले जमते . त्यामुळे खर्च वाढत नाहीत , लाचखोरीला थारा मिळत नाही …। त्याचा सामान्य माणसाला फायदा होतो . बुर्ज ची माहिती आश्चर्य चकित करणारी आहे त्यांच्या वेब साईट वर आहे
१) ह्या उतुंग इमारीतीची उंची ८२८ मीटर्स किवा २७१६.५ फुट आहे .सांगायचे झालेच तर फ्रांस च्या आईफेल टावर च्या तीनपट किवा अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डींग च्या दुप्पट उंचीची आहे
२)वापरलेले कॉक्रिट एकूण एक लाख हत्तींच्या वजनाइतके होते
३)१५ दशलक्ष ग्यालन पाणी दरवर्षी riclyle केले जाते
४)जगातील सर्वात सलग चालणारी लिफ्ट १४० मजले नथांबता प्रेक्षक ग्यालरीत घेऊन जाते या लिफ्ट चा वेग १० मीटर प्रती सेकंद आहे . मोजून एक मिनिटात तुम्ही १४०व्या मजल्यावर जाता .
५) १२००० कामगार आणि कर्मचारी यांनी सहा वर्षात इतकी सुंदर आणि भव्य वास्तु तयार केली
६)११००० टन कॉनक्रीट आणि ५५००० टन स्टील वापरात आले .
७) पाया पासून उद्घाटनास फक्त सहा वर्ष लागली . मनात विचार येतो आपल्या कडे किती रखडला असता असा उपक्रम ? शिवाय एखाद्या निरुपयोगी नेत्यासाठी उद्घाटन विलम्बले असते ते निराळच !!!!! किवा नाव कुणाचे द्यायचे यासाठी भांडणे निराळीच ८)२५००० लिटर्स पाणी प्रतीदिनी १०० किलोमीटर पाईप्स मधून रोज वापरले
जाते
९) तुम्ही बाहेर पडता तेव्हा कामगारा पासून उच्च अधिकारी ज्यांनी या बांधकामात सहभाग घेतला त्यांचे नावासह फोटो लावले आहेत . अगदी सफाई कामगारा पासून . बरेच भारतीय लोक आहेत . बांधकाम कोरियाच्या समसंग ने केले आहे . आपली हिंदुस्तान कॉन्स्त्रशन किवा एलेन्टी चे नाव शोधत होतो !!
एवढा मोठा व्याप हे लोक आधुनिक तंत्रज्ञान वापरून लीलया हाताळत होते . येणारे हजारो लोक हसत मुखाने एथील कमीतकमी कर्मचारी हाताळत होते .
आपल्या सारख्या मोठ्या देशात , जिथे गुणी लोक कमी नाहीत , तिथे असे का होत नाही ? ही चुटपूट लागत होती .
विचार केल्यावर जाणवते , की इथले नेतृत्व अतिशय वेगळे आहे . इथे देशाचा , इथल्या प्रत्येक राष्ट्रीय संपतीचा खूप अभिमानाने काळजी घेतात . मग मी जेव्हा विचार करतो कि आपले नेते , अधिकारी करदात्याच्या पैशावर परदेशी जातात तेव्हा हे अनुभव घेत नाहीत का ? कि वैयक्तिक लाभापुढे काही नाही ?
इथे किवा प्रगत राष्ट्रात जेव्हा एखादा मंत्री किवा प्रधान मंत्री रस्त्याने जातात तेव्हा सामान्य माणसाना वेठीस धरत नाहीत . आपल्या कडे कुणी फडतूस नेता गेला तरी पूर्ण वाहतूक अडवून ठेवतात , कधीतरी हे थांबेल . आणि नागरिकांना , पर्यटकांना ग्राहकराजा सारखे वागवले जाईल
नुकतच एका ठिकाणी ब्रिटीश पंतप्रधान गाडीतून वर्तमान पत्र चक्क उभे राहून वाचत जाताना दिसले . महत्वाची बाब म्हणजे कुठेही सुरक्षा रक्षक नाहीत , आजूबाजूला प्रवासी शांत पणे बसलेले दिसतात
१२१ व्या मजल्यावरून काही फोटो घेतले ते टाकत आहे

No comments:
Post a Comment