Search This Blog

Thursday, 20 February 2014

We take life so much for granted ?

दोन दिवसापूर्वी सकाळी बातमी आली कि माझी प्रिय वाहिनी हे जग सोडून अचानक निघून गेली . काही क्षण मन सुन्न झाले आणि जाणवलं कि  कित्येक गोष्टी , नाती आपण आयुष्यात गृहीत धरून चालतो . जवळपास ४५ वर्षे तिचे माझ्या आयुष्यात असणे मी गृहीत धरून होतो . मला आठवले कि मी शाळेत असताना ती आमच्या घरात सून म्हणून आली मी शाळेत होतो आणि ती तेव्हापासून माझी बहिण , आई  मित्र सर्व काही झाली . आमच्या घरात आम्हा पाच भावंडाना आई खेरीज कुठल्याही स्त्री चा वावर माहीतच नव्हता त्यामुळे वाहिनीचे आमच्या घरी येणे एक नवीन नात्याचे अप्रूप होतो  ……तिने सुद्धा पहिल्या दिवसापासून आपल्या मोकळ्या वागण्याने आम्हा सर्वाना प्रेम दिले . मी तर तिच्याबरोबर मुंबईला शिकायला आलो  . तेव्हा पासून अगदी परवा कायमचे सोडून जाण्यापूर्वी मुलाप्रमाणे प्रेम केले . माझ्या आजारपणात काळजी घेतली , देवाकडे साकडे घातले .

मला प्रथम Management Trainee म्हणून नोकरी मिळाली तेव्हा किती अभिमानानी सुंदर घड्याळ आणि ब्रीफ केस आणून अभिमानाने दिली  . सकाळी पाच वाजता उठून डबा  करून द्यायची …। हे सर्व करताना आनंद ओसंडून जात असे .  माझ्या करियर करण्यात तिचा वाटा  सिंहाचा !!!

आज फक्त आठवणी दाटून येतात . वाटते माणूस असतो तोपर्यंत त्याच्या असण्याची किमंत आपल्याला कळत  नाही …।  पण नसल्यावर किती मोठी किंमत चुकवली याची जाणीव होते जरी आपल्याला माहित असते येणारी व्यक्ती जाणार असतेच .

अश्या प्रेमळ वाहिनीला श्रद्धांजली ! 

No comments: