Search This Blog

Friday, 29 November 2013

Birthday wishes and me

आज वाढदिवसाच्या शुभेछा प्रिय जणांकडून आल्या तशाच वरकरणी शुभेचू पण मागून सतत द्वेष करणाऱ्या सहकारी किवा नातेवाईकांकडून सुद्धा आल्या .

  खरेतर वाढदिवस साजरा करणे वगैरे काही आपली संकल्पना नाहीच . पूर्वीच्या काळी घरात एवढी मुले असायची कि घराच्या बाईला  मुलांचे जन्म दिवस लक्षात ठेवून साजरे करणे जमत नसावेच . शिवाय एकत्र कुटुंबात सर्वांचे वाढदिवस शक्यच नसे . पण हळू हळू कुटुंबे छोटी झाली आणि बायका सुद्धा मिळवू लागल्याने पैसे येऊ लागले आणि मग वाढदिवस साजरे होऊ लागले . मग मित्रांना आणि मैत्रीणीना बोलवून समारंभ चालू झाले .   काही जण  भेटी द्याव्या लागतात म्हणून टाळण्याची करणे शोधू लागली !

तर  आज मला  जेव्हा शुभेच्या येऊ लागल्या तेव्हा विचार करू लागलो वाढदिवसाचे आपले कर्तुत्व काय ? वयाची एवढी वर्षे येण्या साठी आपण काय केले ? आई वडिलांनी जन्म दिला आणि निसर्ग धर्माच्या  नियामापणे वाढत गेलो ……मग सर्व  जण नियमाने अभिनंदन का करतात?  नेते मंडळी लहान थोर आपले
कागदी होर्डींग्स  लाऊन मोकळे होतात  . काय त्यांचे कर्तुत्व ? माझ्या पुरते बोलायचे तर सतत ध्येय , अर्थात , स्वताच्या समृद्धी साठी धावत राहिलो . प्रथम अभ्यास , नंतर करियर …हे करताना कित्येकांना कर्तव्यासाठी दुखावले , जे माझ्या बरोबरच्या स्पर्धेत हरले अर्थात ते तर अतिशय जास्ती दुखावले .

पण याच आयुषाने खूप चांगले संस्कार देणारे आई आणि वडील दिले ,खूप प्रेम करणारे घर दिले , अत्यंत जिव्हाळा देणारे मित्र मैत्रिणी दिल्या , मला घडवणारे गुरु दिले तर कर्तव्य आणि काम याला देव  म्हणायला शिकवणारे  बॉसेस  दिले !   संकटात किवा सुखात अलिप्तपणे   साथ देणारी पत्नी मिळाली आणि जीवनात रंग भरणारी गोड  नातवंडे मिळाली !  आयुष्यात या पेक्षा काय हवे असते !

जेव्हा बाबा आमटे सारखी माणसे पाहतो तेव्हा जाणीव होते कि आपण आयुष्यात असे का केले नाही  ज्यामुळे हजारो लाखो लोकांना जगण्यासाठी मदत केली ? जंगलात जाऊन आनंदवन तयार केले , किती लोंकाची सेवा केली आणि महारोग्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला .  ह्या कामासमोर माझे काम ते काय ?

स्वतः पुरते जगण्यात काय कर्तुत्व आहे ? असा विचार सतत घोळत असला तरी काहीच केले नाही , ही खंत वाटतेच

उरले आयुष लहान मुलांना ज्यांना बालपणाच्या आनंदा  पासून वंचित राहावे लागते त्यासाठी माझ्या परीनी जे करता येईल ते करेन …. आज निदान संकल्प सोडत आहे . पुढल्या वर्षापर्यंत  काही तरी काम करीनच .






No comments: