काल दिवसभर टेलीविजन वर एका बातमीने दिवस भर जगासमोर आपल्या मूर्खपणाची साक्ष जगाला देत होतो. प्रसार माध्यमे सुद्धा त्यांच्या ओबी व्यान्स दिवसभर ठेऊन भर पाडीत होत्या . उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यात एका साधूला म्हणे दृष्टांत झाला कि एका जुन्या किल्ल्यात १००० टन सोने पूर्वजांनी पुरून ठेवले आहे . ह्या बातमीने सरकारचे पुरातत्व खाते त्यांच्या सर्व साधनानिशी धावत गेले , मग खुपसे सरकारी अधिकारी , पोलिस आणि प्रचंड जत्राच भरली . जत्राच ती , मग उघड्यावर जिलब्या , आणि इतर खाद्य यांचा धंदा चालू झाला ……। इकडे नरेंद्र दाभोलकर असल्या अंध श्रद्धा विरुद्ध झगडून आयुष्याची आहुती देऊन गेले ,
किती अंध श्रद्धा आपल्या समाजात बोकाळल्या आहेत ,
एकीकडे मंगळावर यान पाठ्वयाची शेखी मारायची आणि दुसरीकडे मंगळ पत्रिकेत आहे म्हणून लग्न मोडायचे ! गुप्त धनासाठी बालकाचे बळी , मुलगी होणारं म्हणून तिचा जन्माआधीच गळा दाबायचा . खूप चीड येणाऱ्या गोष्टी आपल्या कडे घडताहेत . यात सुक्षिक्षित मंडळी काही मागे नाहींत . कुलदीपक हवा म्हणून ही मंडळी काही करण्यास तयार असतात . माझ्या आईला आम्ही पाच मुलेच . त्यामुळे कित्येक नातेवाईक आणि ओळखीची मंडळी माझ्या आईकडे पाळणा मागून घेऊन जायचे . अंधश्रद्धा अशी कि त्या पाळण्यात फक्त मुलगा जन्माला येतो . मी तर म्हणायचो कि आपण त्यावर रोयाल्टी लावावी . तर सांगायचे म्हणजे हि मुलासाठी असलेली ओढ कित्येक मुलींचा बळी घेत आहेत . कालच्या वर्तमान पत्रात अशीच एक धक्कादायक बातमी होती . मुलगी झाली म्हणून छोट्या बाळाला तिच्या पित्याने आपटून मारून टाकले ………
एक कविता ऐकली होती . ती साधारण अशी होती . एक छोटी स्वर्गातून आपल्या आईला उद्देशून म्हणते, जिला जन्म होण्या आधीच मारले होते … गर्भलिंग तपासणी नंतर ……क्रुर पणे
आई तुझी इथे खूप आठवण येते
इथं सर्व काही छान आणि सुंदर आहे
इथे दुधाच्या नदया वाहतात
इथे चॉकलेट ची घरं आहेत
इथे कुणी मला मुलगी म्हणून मारत नाहीत
तरी पण आई तुझी खूपच आठवण येते
का ग आई मला इथे पाठवून दिलेस
खूप गर्दी झाली आहे का पृथीवर
इथून तर पुर्थ्वी खूपच छान छान दिसते
कसे आहेत बाबा , मला त्यांच्या कुशीत झोपायचे होते
पण का तुम्ही मला दूर केलेस
आई तुला तुझ्या आईने असच इथे पाठवले असते तर
पण तुझी खूपच आठवण येते ....असा काही आशय होता , पण खूपच हृदयस्पर्शी !
हा प्रश्न सर्व बायकांनी सक्षम होऊन सोडवला पाहिजे . आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत . आपल्या करिअर वर किवा आपल्या गुणावर पाणी सोडू नये
.
नवरा आणि बायको समान हक्काने जगलेच पाहिजेत . असे मला नेहमी वाटते…
नवरा आणि बायको समान हक्काने जगलेच पाहिजेत . असे मला नेहमी वाटते…
आपण सर्वांनी आपल्या पुरते बदलले तरी खूप होणार आहे , घरातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या स्त्रीला मान आणी योग्य कौतुक ठेवावा . माझी चिमुरडी नात हि जगातील सर्वात गुणी आणि सुंदर मुलगी वाटते ती ह्य्साठीच .
No comments:
Post a Comment