काही दिवसापूर्वी माझ्या बिल्डींग मध्ये राहणारे एक गृहस्त अचानक वारल्याचे समजले . आदल्यादिवशी लिफ्ट मध्ये भेटले होते तेव्हा नेहमीप्रमणे हसले आणि बोलले . मग अचानक काय झाले ? ऐकून धक्का बसलाच पण विचारचक्र चालू झाले … असे झाले की हे गृहस्त गुजराथी व्यापारी होते आणि नेहमी १० /११ वाजता घरी यायचे . नेहमी सकाळी देवळात , घरासमोर रस्ता ओलांडला कि असणारे , जायचे . पण ज्या रात्री ते निवर्तले त्या रात्री ११ वाजता रिक्षेतुन देवळासमोर थांबले आणि देव दर्शन घेण्यासाठी उतरले तोच झाडाची फांदी अचानक तुटून त्यांच्या डोक्यावर पडली आणि तत्काळ मृत्युमुखी पडले . …… असे का होते कि लोक देवळात किवा देवळाला जाताना अपघाती मरतात ? आपण नेहमी वाचतो एखादे कुटुंब शिर्डीला किवा तिरुपतीला किवा आणखी कुठ्लाश्या देवस्थानाला खास गाडी करून जात असते किवा दर्शन घेऊन येत असते आणि अखं कुटुंब अपघातग्रस्त होते …असे का ?? देव असेल तर त्याला आपल्या भक्तांना का सवरक्षण देता येत नाही . दिंडीत असंख्य गरीब वारकरी श्रद्धेने देवाला जातात , बरचसे खेडूत शेतकरी असतात मग बिचारे इतर वेळेला का गरिबीत आयुष काढतात . त्यांच्या अपेक्षा खूपच माफक असतात आणि देवावर अपार श्रद्धा असते तरी त्यांना सावकार , राजकारणी , अधिकारी सर्व मिळून पिळून काढतात . असे का ??
मोठ्या देवस्थानात संचालक , पुजारी दागिने चोरतात , भ्रष्ठाचार करतात , गरीब भाविकांना लुटतात ते सुटून जातात आणि सुखात राहतात असे का ???
कुणीतरी देवाची सोन्याची मूर्ती चोरून , वितळवून पैसे कमावतात पण त्यांना का शिक्षा होत नाही ??
मध्ये कुठेतरी वाचले कि ते ऐकून धक्का बसला . भारतात मोठ्या देवास्थाना मध्ये प्रचंड संपती पडून आहे . दरवर्षी मिळणारे दान अंदाजे असे आहे
- तिरुपती बालाजी १ हजार १३५ कोटी
- वैष्णोदेवी ४०० कोटी
- पुरी जगनाथ १६० कोटी
- शिर्डी साईबाबा १०० कोटी
- अयोध्या राममंदिर १४० कोटी
- कोलकत्ता कालीमाता २५० कोटी
- द्वारकाधीश ५० कोटी
- मुंबई सिद्धीविनायक २७ कोटी
- त्रावणकोर ३५ कोटी
- वैद्यनाथ धाम ४० कोटी
देशातील सर्व धार्मिक स्थळाकडे सुमारे८० लाख कोटी जमतात म्हणे ? खरे किती आणि काल्पनिक किती हे मला माहित नाही . देशाच्या आर्थिक बजेट पेक्षा जास्तच असावे . हे सर्व देवावर श्रद्धा असणाऱ्या भाक्तानीच दिले आहेत . मग देशातील सर्व गरजू नागरिकांना मिळाले तर फार छान होईल . हे जर मला वाटत असेल तर आम्ही निवडून दिलेल्या आमच्या सत्ताधीशांना का समजत नाही हा प्रश्न मला सतावतो आहे . खूपच भाबडा विचार वाटेल पण इलाज नाही .
आज गुडी पाडवा . देवाजवळ एकच प्रार्थना .
तुझ्या गरीब आणि सामान्य जनतेला अधाशी भ्रष्ट अधिकारी नेत्यापासून वाचव . नेत्यांना , पैशेवाल्या , वजनदार अश्या माणसाना वेगळे दर्शन देऊ नकोस . एवढे केलस तर मी मानेन
आज गुडी पाडवा . देवाजवळ एकच प्रार्थना .
तुझ्या गरीब आणि सामान्य जनतेला अधाशी भ्रष्ट अधिकारी नेत्यापासून वाचव . नेत्यांना , पैशेवाल्या , वजनदार अश्या माणसाना वेगळे दर्शन देऊ नकोस . एवढे केलस तर मी मानेन

No comments:
Post a Comment