शेक्सपीअर आजच्याच दिवशी , २३ एप्रिल १६१६ , म्हणजे बरोबर ४०० वर्षापूर्वी मरण पावला . आजही जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही जिथे त्याच्या साहित्याचा प्रभाव पडला नाही . आज गुगल ने त्याचे चित्र dudal लाऊन सर्व जगाला त्याची आठवण करून देऊन त्याच्या कामाची आठवण जागवली आहे . तो अस्सल किमयागार होता हे खरे . तो फक्त ५२ वर्षे जगाला पण किती प्रचंड काम केले .
इंग्रजी साहेबाचा कौतुक असे कि आज आजही stanford ह्या त्याच्या जन्म गावी त्याचा जन्मदिन सण साजरा केल्याप्रमाणे त्याला अभिवादन करतात
गोविंद तळवलकर म्हणतात "शेक्सपीअरच्या नाटकांना देशकालाच्या मर्यादा नव्हत्या . त्यामुळे असे म्हणायचा प्रघात पडला की सर्व जग हि रंगभूमी होती आणि रंगभूमी ही त्याचे जग होते "
नेल्सन मंडेला त्यांच्या २७ वर्षाच्या कारावासात शेक्सपीअरचे सर्व साहित्य खंड ठेऊन असायचे . ज्या रॉबिन बेटावर ते होते त्याला तेथील बायबल असे म्हणायचे . साथीदारांना नाटकातील उतारे वाचून दाखवायचे
कधीतरी शेक्सपीअर वाचायची इच्छा आहे किवा त्यासाठी माझ्या इंग्रजी जाणणाऱ्या मित्राला गाठणार आहे
![]() |
| किमयागार |
तसे तर युगपुरुष नेहमीच छोट्या आयुष्यात खूप अलौकिक कामं करून आपला ठसा कालातीत ठेवतात . द्यानेश्वर माउली , शिवाजी महाराज किती कमी आयुष जगले पण त्यांनी केलेली कामं सामान्य माणसाला दहा आयुष्यात जमली नसती .
त्याच्या हयातीत इंग्रजांनी खूप ,मान आणि पैसा दिला . आणि त्याच्या मृत्यू नंतर ४०० वर्षे त्याचे घर , तो जिथे राहायचा ती वास्तू अजूनही प्राणापलीकडे जपून ठेवली आहे . गेल्या चार शतकात जगातील सर्व देशात त्याची नाटके , कविता , सुनीते (Sonnet) ह्या बऱ्याच आधुनिक भाषात झाली आहेत . असे म्हणतात त्याची सुनीते एका स्त्री ला उद्देशून आहेत . मेरि फिटन या कृष्णवर्णीय स्त्रीला उद्देशून होती, ती म्हणे इतर इंग्रजा पेक्षा कमी गौर वर्णीय होती . ती खूप धनिक होती आणि त्याच्या प्रेमात होती असेहि म्हणतात .
तसे तर तो नट होण्यासाठी लंडन मधील ग्लोब थिएटर मध्ये आला पण नंतर नाट्य लेखनात गुंतला । ती नाटके इतकी गाजली की मानवी मन आणि नातेसंबध ह्याचे अतिसुंदर कालातीत भाष्य होऊन राहिली आहेत गेली चार दशके . आपल्या कडेही हिंदी ,मराठी नाट्य व सिनेमा मध्ये खूप प्रभाव करून गेला आहे . ज्यांनी शेक्सपीअर वाचला सुद्धा नाही त्यांना सुद्धा ह्या मराठी हिंदी कलाकृतींनी प्रभावित केले . ह्यावरून शेक्सपीअरनी लिहलेल्या कलाकृती किती समृद्ध होत्या ह्याची कल्पना येते. आपल्याकडे कुसुमाग्रजांनी नटसम्राट अजरामर केलं . विशाल भारद्वाज ने मकबूल (म्याक्बेथ ) , अंगूर (कॉमेडी ऑफ एरर्स ) , ओंकारा , हैदर (hamlet ) सारखे आधारित अप्रतिम सिनेमा बनवले . इतकी वर्ष होऊन मानवी स्वभाव बदलला नाही हे खरच म्हणायचे
आमच्या शाळेत देशपांडे सर होते ते लिअर ची कथा मन लाऊन सांगत ……. ते सांगताना ते अभिनय करत असत . तेव्हा पासून वाटायचं कि आपण कधीतरी आयुष्यात शेक्सपीअर वाचायचा .
त्याशेक्सपीअरची वाक्ये आपण अगदी सहजपणे वापरतो …… to be or not be , Brutus you too , That omay smile and smile and be a villain " हे Hamlet मधले प्रसिद्ध वाक्य , जे आपण रोजच्या आयुष्यात दुट्टपी वागणाऱ्या मित्राचा बुरखा फाडणारा आहे
ज्या काळात शेक्सपीअर लिहित होता त्याचकाळात आपल्याकडे संत एकनाथ द्यानेश्वरीची ची प्रत शुद्ध करण्यात गुंतले होते असे म्हणतात . शेक्सपीअर काळाच्या पुढे असणे दिसून येते . आजहि जगातील भाषा शास्त्रज्ञ , मानसशास्त्रज्ञ त्याच्या समस्त लिखाणाचा अभ्यास करीत आहेत

No comments:
Post a Comment