Search This Blog

Wednesday, 17 February 2016

Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam.


अवुल पकिर जैनुलाबीन अब्दुल कलाम  हे वाचल्यावर  पटकन समजत नाही पण हा अवलिया म्हणजे देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अे पी जे कलाम . बुद्धिमत्ता अचाट , देशावर प्रेम प्रचंड , कुणाचहि  दडपण घेऊन कधीही तत्वाशी तडजोड केली नाही . धार्मिक पण निधर्मी  आचरणा मुळे कधी कडवट विचाराना  थारा नाही , सत्तेची हाव नाही आणि त्यामुळेच राष्ट्रपती पदाला एक वेगळीच शान आणून देणारे लोकांचे असे राष्ट्रपती होते . पण क्षुद्र राजकारण्यांनी त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली नाही .
त्यांच्या साधेपणाचे खूप किस्से  प्रसारित आहेत काहीना व्यक्ती पूजेचा वास आहे तर काही अगदी खऱ्या आहेत
डॉक्टर  ए पी जे 

टि वी   वर , पी म  नायर  नावाच्या एका सनदी ( IAS) अधिकाऱ्याची  मुलाखत होती . हे गृहस्थ  एपजे यांचे सेक्रेटरी  होते त्यामुळे त्यांनी त्यांना खूपच जवळून पहिले होते .  त्यांचा आवाज भावनांनी दाटून आला  होता . त्यांनी KALAM EFFECT  नावाचे पुस्तकही लिहून ठेवले आहे ।  त्यातील काही अनुभव वाचून अशी माणसे फार अभावाने जन्म घेतात हे जाणवते आणि अश्या लोकांना स्वार्थी राजकारणी कसे दूर करतात हे वाचूनहि  वाईट वाटते ,

  1. डॉक्टर  कलाम  जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर  जायचे तेव्हा राजशिष्टाचारा नुसार तिथले प्रमुख अतिशय महागडया भेटी आठवण म्हणून द्यायचे . त्या संकेता प्रमाणे नाकारता येत नसत कारण तो यजमान राष्ट्रप्रमुखाचा अवमान समजला जायचा ।  या  सर्व भेटी ,कलाम  परत आल्यानंतर , त्यांचे फोटो काढून त्या सर्वांचा  catlogue करून  संग्रहालायात  (archives) पाठवून द्यायचे ( शोधा  किती जण  असे करतात )
  2. त्यानंतर  त्यांनी त्या भेटवस्तू कडे बघितलं  सुद्धा  नाही . जेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवन  सोडले तेव्हा साधी पेन्सिल सुद्धा बरोबर घेतली नाही 
  3. २००२ साली जेव्हा कलाम राष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती भवनात राहण्यास  आले तेव्हा रमादान महिना जुलै मध्ये       होता आणि प्रथेप्रमाणे इफ्तार पार्टी  होणार होती , पण कलामांनी नायर ना  विचारले कि ही पार्टी ज्यांची पोटे      भरलेली आहेत त्यांना का द्यायेची ??? आणि या पार्टी किती खर्च करणार आहात ? नायर जेव्हा म्हणाले कि साधारण  २२ लाख खर्च असेल , तेव्हा कलामांनी त्यांना सांगितले कि हा खर्च काही अनाथाश्रम शोधून कपडे , खाद्य पदार्थ आणि blankets मध्ये करा ।  त्यानंतर कलामांनी त्यांना १ लाख रुपयांचा चेक आपल्याकडून दिला !!!! वर नायारना  सांगितले कि  हे कुणाला सांगू नका । नायारना राहवले नाही . ते म्हणाले " सर  मला जाऊन सांगावेच लागेल कि इथे एक माणूस असा आहे कि जो खर्च करायचे पैसे वाटून टाकतो आणि वर स्वतः चे पैसे देतो " लोकांना हे समजलेच पाहिजे .  कलाम मुस्लिम होते पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकही इफ्तार पार्टी दिली नाही  
  4.     डॉक्टर कलाम ना ,  "YES SIR " वाले लोक आवडायचे नाहीत . एकदा सर्वोच न्यायालयाचे न्यायाधीश आले होते बोलायच्या ओघात त्यांनी नायारना विचारले  Do you agree ?. एकाद्या अधिकाऱ्याला  नाही म्हणायची  काय बिशाद ? पण नायर  "नाही " म्हणाले .  न्यायाधीश चकित झाले आणि नंतर  नायारना विचारले हे कसं  काय ?  नायरांचे  उत्तर , तुमचे म्हणणे खरे आहे . नंतर मला ते विचारतील " तू नाही का म्हणालास " जर पटले तर नक्कीच त्यांचा निर्णय बदलतील 
  5. एकदा डॉक्टर कलमानी त्यांचे पन्नास नातेवाईकांना दिल्ली  पाहण्यास बोलवले आणि राष्ट्रपती भवनात राहण्याची सोय केली । दिल्ली पाहण्यासाठी त्यांनी स्वतः दोन लाख खर्च करून बस दिली .इतिहसात कुणी  असे केलेच नसेल . साधेपणाचा कडेलोट नंतर आहे… त्यांचा मोठा भाऊ एक आठवडा दिवशी  त्यांच्या खोलीत राहिला । नंतर कलामना त्या राहण्याचं भाडे द्यायला तयार होते अर्थात स्टाफ नी कडाडून विरोध केलांनी भाडे भरण्यापासून थांबवले …… they thought honesty was getting too much too handle !!!!!!!
  6. जेव्हा त्यांना राष्ट्रपती भवन सोडायची वेळ आली तेव्हा सर्व स्टाफ त्यांना भेटून अभिवादन करीत होते तेव्हा नायर एकटेच आले होते . राष्ट्रपतीनी त्यांची पत्नी का आली नाही असे विचारले असता ते म्हणाले कालच तिला छोटासा अपघात झाला आणि तिचा पाय फ़्रच्चर झाला आहे ……… दुसऱ्या दिवशी नायर थक्क झाले राष्ट्रपती स्वतः भेटायला आले . 
असे साधे , प्रेमळ , निगर्वी माणूस विरळाच !!


No comments: