तंत्रज्ञान आणि आपण
हल्ली आपण अगदी सहजपणे कुणा लाही सांगतो …TEXT कर किवा व्हात्सप कर . मग त्यावर फोटो , कॉपी एका सेकंदात जगाच्या टोकावर कुठेही पाठवतो . अगदी तीन चार वर्षाची माझी नातवंडे सुधा सहज पणे त्याचा वापर करतात
. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात खूप ताणताणाव निर्माण केले आहेत हे खरे । एख्द्याने जर whatsap केले असेल आणि त्याला तुम्ही जर का उत्तर दिले नाहीत तर खैर नाही . जर तुमच्या बॉस ने पाठवले असेल आणि तुम्ही उत्तर दिले नसेल तर तुम्ही नॉन रीस्पोन्सीव सहकारी ठरता . … मग बरीच वर्ष मागे गेले की जाणवते आयुष्य खूप शान्त आणि सुखाचे होते . मी जेव्हा नौकरी सुरू केली तेव्हा संगणक सुरु झाले होते . मेमो सेक्रेटरी तयार करून त्यावर सही केल्यावर पाठवले जायचे . दोन दिवसांनी त्याला उत्तर यायचे . एकूणच सर्व काही शांतपणे चालायचे .
तीच गत फोन च्या बाबतीत . आठवा तो काळ जेव्हा फोन नोंदणी करताना टेलिफोन वाले ग्राहकांना रडकुंडीला आणायचे . ज्यांच्याकडे घरी फोन असायचे त्यांना खास status असायचे .
पण सॅम पित्रोदा या विलक्षण माणसाने सर्व चित्र बदलूनच टाकलं . नन्तर बाहेर गावी किवा परदेशी बोलणे फारच सोपे झाल.
नंतर अर्थात मोबाईल फोन ने उल्थापालथ केली . अगदी भाजीवाल्यापासून मोलकरणी पर्यन्त सर्वच फोन कानाशी लाऊन बोलताना दिसले . त्या बरोबर सर्व माणसे जोडली गेली . मग ती पत्रे , तारा सर्व काही गायब झाली . पण
त्याच बरोबर प्रेमाची , वाट पाहायला लावणारे सुंदर क्षण हि हळू हळू लुप्त झाले . पत्रांची वाट पाहणे संपले . वाढदिवसाला किवा सणांना भेटून सदिच्छा काळाआड गेल्या आणि कोरडे SMS फिरू लागले ।
मग वाटते तंत्रज्ञान आणि आपण याचा योग्य balance व्हायला हवं

.jpg)
No comments:
Post a Comment