आज गणपती बाप्पाला सर्वांनी निरोप दिला . गेले दहा बारा दिवसात सर्व लोकांचे कान किटून गेले असतील.कित्येक आजारी किवा लहान मुलांच्या झोपा कर्कश आवाजाने उडाल्या असतील
पण त्याचे कुणालाच देणे घेणे नाही . सण किवा एखादा धार्मिक क्षण साजरा करताना ध्वनी प्रदूषण का करतात आणि कुठल्या शास्त्रात लिहून ठेवले आहे हे त्यांनाच माहित . खरे तर
साक्षात गणपती सुद्धा आवाजाला किटला असेल. तो देवच का हे बंद करीत नाही हे माहित नाही
बिचारे लोकमान्य टिळक ! त्यांना खरे आपण हे सर्व का सुरु केले असेच वाटत असेल. जन जागृती साठी सुंदर प्रसन्न प्रयोग सुरु केले त्याचे इतके बाजारीकरण होईल असे वाटले नसेल त्यांना.
sorry आदरणीय लोकमान्य टिळक . आम्ही तुमचे कार्य कुठल्याच क्षेत्रात तडीस नेहेले
नाही. देशभक्ती फक्त सिनेमा गृहात राष्ट्र गीत चालू होते तेव्हा उठून उभे राहण्यापुर्ते मर्यादित ठेवले आहे .
पुढील वर्षी देव आम्हाला सद्बुद्धी देओ .
No comments:
Post a Comment