माझ्या लहानपणापासून शिपिंग व्यवसायाचे एक प्रचंड आकर्षण होते . माझ्या शाळेत एकदा एका शिपिंग कंपनीचे काही अधिकारी आले होते आणि माझ्या एका मित्राच्या भावाला खलाशी म्हणून नेमणूक करून घेऊन गेले. सबंध गावामध्ये चर्चा आणि चुरस कथा येऊ लागल्या . त्या काळी इम्पोर्टेड वस्तूंचे आकर्षण त्यांनी सुट्टीत आणलेल्या आम्हा सर्वाना होताच .
नंतर माझा मोठा भाऊ अधिकारी झाला . त्याच्या बोटीवर फाइव स्टार हॉटेल प्रमाणे वातावरण पाहून आम्ही सर्व खुश होत असू .
पण हल्ली जागतिक मंदी मध्ये हा पूर्ण व्यवसाय भरडला गेला आहे . त्यातून सागरी चाचे अधून मधून जीवघेणा त्रास देतात . आपल सरकार फार काही करू शकत नाही .
आज बातमी वाचली ......कित्येक बोटी बंदरात अडकून आहेत . इंधन नाही , काम नाही म्हणून बोटीवरील लोकांना पगार नाही सुविधा नाहीत ......न्यालायानी बोटी विकून पगार द्या म्हणून आदेश दिलेत ....पण इलाज नाहीत....
अचानक आलेली स्थिती पाहून वाईट वाटले . एक चकचकीत असा मार्ग असुरक्षित झाला
खरे तर देशाची अर्थ व्यवस्था पूर्ण अवलंबून असते .
कधी बाहेर पडेल या वाईट अवस्थेतून ?
No comments:
Post a Comment