मंगलमूर्ती गजाननाचे आगमन उद्या सर्वत्र होईल . गणपती दैवत हे माणसावरील संकटे दूर
करते अशीच श्रद्धा आहे . गणपतीच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण होते . पण आज ह्या गोष्टीवरून विश्वास उडू लागला असे वाटते . कारण आज सर्वाचे बाजारीकरण झाले आहे . छोटे मोठे राजकारणी आणि गुंड प्रवृत्तीचे गल्लीतले नेते यांनी बळजबरीने हे सार्वजनिक गणपती मंडळे हाती घेतले आहेत . आणि तिथूनच चांगली माणसे मागे पडली .पूर्वी हि सर्व मंडळे समाजातील विचारवान्ताना बोलवीत असत , उत्तम कलावंताना आदराने कला सादर करण्याची संधी दिली जात असे. वातावरण एका पवित्र भावनेने भरलेले असायचे . आज सगळीकडे खर्चिक रोषणाई ज्या लोकांवर लादलेल्या वर्गणीतून केल्या जातात . लोकाच्या भावनांचा बाजार करून गर्दी करण्यासाठी वापरायचा हे सरास चालू आहे. अर्थात काही मंडळे अपवाद आहेत.
आताशी हे सण आले कि अंगावर काटा येतो . जोरजोरात कर्कश आवाजात ढोल बडवतात त्यात बॅंजो नावाचे विचित्र वाद्य कान किटून टाकतात . त्यांना कसा त्रास होत नाही हे मोठे कोडे असतं. त्यांची काय मानसिकता असते हे त्यांनाच माहित .
तीच गोष्ट गोविंदाची . मुले पडतात आयुष्यात उठून जातात.
का आपला समाज राजकार्ण्याचा पाठ पुरावा करतात . ? का पर्यावरणाचा नाश करताहेत ?
गल्ली बोलत गणपती बसवण्या ऐवजी एका ठिकाणी बसवून खर्च कमी करत नाहीत?
मी कधीच गर्दीत घुसून दर्शन घेत नाही किवा पैसे देऊन , कोणाची तरी ओळख काढून घुसायचा प्रयत्न करीत नाही
माझ्या कडून मी प्रामाणिक पणे सर्व बाजारीकरणा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो किवा
पळवत शोधतो म्हणायचे .
कधी तरी धैर्य येउन मी मी वाईट प्रवूर्तींचा मुकाबला करेन !!
No comments:
Post a Comment